बिबट्यांनी एकाच शेतकऱ्याच्या अकरा बकऱ्या केल्या फस्त

पराग जगताप 
रविवार, 21 जानेवारी 2018

उदापूर ता. जुन्नर - येथे बिबट्यांनी हल्ला करुन एका शेतकऱ्याच्या गोठ्यातील अकरा बकऱ्या ठार मारल्यात. पैकी सात पळवून नेलीत. तर चार जागेवरच मारुन सोडून दिली आहेत.

उदापूर ता. जुन्नर - येथे बिबट्यांनी हल्ला करुन एका शेतकऱ्याच्या गोठ्यातील अकरा बकऱ्या ठार मारल्यात. पैकी सात पळवून नेलीत. तर चार जागेवरच मारुन सोडून दिली आहेत.

आज रविवारी पहाटे विठ्ठल खंडु सस्ते यांच्या उदापूर येथील मोरेची पाईन येथील परिसरात ओढ्या जवळील साध्या पध्दतीच्या कुडाच्या गोठ्यावर बिबट्याने हल्ला करुन टोमॅटोच्या कॅरेट मध्ये ठेवलेली शेळीची दोन ते तीन दिवसाची चार बकरे मारुन जागीच टाकली. तर आठ ते पंधरा दिवसाची सात बकऱ्या उचलून नेल्यात. सदर घटनेबाबत उदापूरचे माजी सरपंच बबन कुलवडे यांनी वनविभागाला कळवले आहे. याबाबत ओतुर वनविभागाचे वनरक्षक एस. जी. मोमीण व एस. बी. महाले यानी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे. प्राथमिक तपासणीत येथे बिबट्याचा व दोन ते तीन बछड्याचा वावर असल्याचे दिसून आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शासकीय नियमाप्रमाणे सस्ते यांना आर्थिक नुकसान भरपाई दिली जाईल असे सांगितले. वनविभागाने या परिसरात पाहणी करुन बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावावा अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.

Web Title: marathi news leopard killed goats