अंत्योदय योजनेतून दिव्यांगांना वगळले 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 डिसेंबर 2017

मंचर : राज्य शासनाने गरीब व गरजू लोकांना स्वस्त धान्य मिळावे, या उदेशाने अंत्योदय, अन्नसुरक्षा रेशनिंग योजना सुरू केली; परंतु या योजनेत पात्र असलेल्या जिल्ह्यातील 300 दिव्यांग व्यक्तींची नावे अंत्योदय यादीतून काढून टाकली आहेत. एक महिन्यापासून त्यांना रेशनिंग दुकानातील होणारा धान्यपुरवठा बंद झाल्याने त्यांच्यावर आता उपासमारीची वेळ आली आहे. 

अपंग संघाचे संस्थापक-अध्यक्ष दीपक ढोबळे यांनी हा प्रश्‍न धसास लावण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ते म्हणाले, ""दिव्यांगांचा समावेश अंत्योदय योजनेत झाला पाहिजे. अंत्योदय, अन्नसुरक्षा रेशनिंग योजनेचा लाभ हा प्रामुख्याने गरजू, निराधार लोकांना होण्याऐवजी धनदांडग्या कुटुंबांना होत आहे. या योजनेत आता फेरबदल करून दोन किंवा त्यापेक्षा कमी व्यक्तींची नावे शिधापत्रिकेत असतील, तर अशा व्यक्तींची नावे अंत्योदय योजनेतून काढून टाकण्याचा आदेश रेशनिंग दुकानदारांना प्रशासनाने दिले आहेत. 

शिधापत्रिकेतील नावे रद्द करताना दिव्यांग लोकांची नावेही रद्द झाली आहेत. आंबेगाव तालुक्‍यात 40 दिव्यांगांची नावे रद्द झाली आहेत. एक महिन्यापासून त्यांची नावे अंत्योदय यादीतून काढून टाकल्याने त्यांचे रेशनिंग बंद झाले आहे.'' दिव्यांगांना अंत्योदय योजना लागू करण्याऐवजी त्यांना आहे त्या योजनेतूनच वगळल्यामुळे त्यांच्यावर सरकारने केलेल्या या अन्यायाबद्दल अपंग हित, विकास व पुनर्वसन संघाच्या वतीने मंगळवारी (ता.26) जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा ढोबळे यांनी या वेळी दिला. 

Web Title: marathi news local antyoday sceme blind peoples removed