बालिकेच्या ह्रदय प्रत्यारोपणासाठी मदतीचे आवाहन

दत्ता म्हसकर
गुरुवार, 7 डिसेंबर 2017

जुन्नर : महेंद्र नारायण देशपांडे यांनी सांगितले की, नऊ वर्षांपूर्वी पोटी लक्ष्मी जन्माला आली. जन्मत: ती आजाराने त्रस्त आहे. माझ्या परिवारात आम्ही एकूण सात सदस्य व मी एकटाच कमवता. परिस्थिती खुप नाजूक परंतु परमेश्वराची कृपा शिक्षण चांगले घेतले म्हणून शिक्षक झालो. मी सध्या पंढरपूर येथे वास्तव्यास आहे.

श्री छत्रपती शिवरायांच्या जन्मभूमीत जुन्नर तालुक्यातील दुर्गम भागात देवळे या ठिकाणी मुलीचा आजार चालूच होता. कशीबशी ती जुन्नरमधील प्राचार्य सबनीस प्राथमिक विद्यालयात ती या आजारात चौथीपर्यंत शिकत आली. 2012 मध्ये तिच्यावर रूबी हाॅल क्लिनिकमध्ये बी.ए.व्ही ची शस्त्रक्रिया करण्यात आली. तिला चांगले वाटू लागले. परंतु आता ऑक्टोबर 2017 मध्ये तिला पुन्हा आजाराने ग्रासले. तिच्यावर रूबी हाॅल क्लिनिक पुणे येथे पुन्हा उपचार सुरू केले.

मात्र, इम्युनिटी पाॅवर फारच कमी असल्याने डाॅक्टरांनी लसीकरण सुरू केले आणि एक महिना ती वाढवण्याची मुदत दिली. तसेच तिचे ह्रदय प्रत्यारोपण करावे लागेल म्हणून सांगितले. यासाठी कमीत कमी 25,00,000/- (पंचवीस लाख रुपये ) खर्च होईल असे अंदाजपत्रक त्यांनी दिले आहे. या महिन्यात तिच्यावर अडीच लाख रुपये खर्च केले आहेत. या चिमुरडीचा जीव वाचविण्यासाठी तिच्या बँक खात्यावर आपणास जेवढे काही शक्य असेल तेवढी आर्थिक मदत करा. आपण अगदी एक रूपयांची मदत केली तरी ती तिच्यासाठी नवजीवन असेल, असे आवाहन करण्यात येत आहे.

संपर्क - महेंद्र देशपांडे 9881485854
बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा जुन्नर
खाते क्रमांक - 20167640758
IFSC - MAHB0000623
खातेधारक - रेवती महेंद्र देशपांडे

Web Title: marathi news local junnar news request for financial help