सनबर्न फेस्टिव्हलविरुद्ध चांदणी चौकात आंदोलन 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 डिसेंबर 2017

कोथरूड : सनबर्न फेस्टिव्हल म्हणजे तरुणाईला व्यसनाधीनतेच्या दलदलीत खेचून जीवन उद्‌ध्वस्त करणारा कार्यक्रम आहे, असा आरोप करीत सनबर्न फेस्टिव्हलला विरोध म्हणून चांदणी चौकात बावधन, लवळे तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ व हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या कार्यकर्त्यांनी संस्कृतिरक्षण आंदोलन केले. 

या वेळी नगरसेवक किरण दगडे पाटील, बावधनच्या सरपंच पीयूषा दगडे पाटील, माहिती सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत वारघडे, बावधनचे माजी सरपंच राहुल दुधाळे, ग्रामपंचायत सदस्य सचिन दगडे, आझाद दगडे, वैशाली दगडे, वैभव मुरकुटे, सचिन धनदुडे, सुनील दगडे, धनंजय दगडे, गणेश कोकाटे, उमेश कांबळे, वैशाली कांबळे, नीळकंठ बजाज, दीपक दुधाणे, नितीन दगडे, हिंदू जनजागृती समितीचे पराग गोखले, सनातन संस्थेचे शंभू गवारे यांच्यासह 400 हून अधिक ग्रामस्थ आणि हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. 

या प्रसंगी सनबर्न फेस्टिव्हलला हद्दपार करा, अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या, तसेच सनबर्न फेस्टिव्हलच्या विकृतीच्या विरोधात सरकारने ठोस भूमिका घ्यावी, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी सनबर्न फेस्टिव्हलच्या विरोधातील मत परखडपणे मांडून कार्यक्रमाच्या आयोजकांची करचुकवेगिरी, दांभिकपणा आणि केलेली सरकारी नियमांची पायमल्ली यावर टीका केली. आंदोलनकर्त्यांनी सनबर्न फेस्टिव्हलला केवळ पुण्यातूनच नाही, तर भारतातून हद्दपार करण्याचा निर्धार केला. या वेळी वाहतुकीला अडथळा न होता प्रातिनिधिक स्वरूपात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. 
 
Web Title: marathi news local news agitation against sunburn festival