हिवाळी अधिवेशनात सात मागण्यांसाठी आमदार भरणे आक्रमक

राजकुमार थोरात
शनिवार, 23 डिसेंबर 2017

वालचंदनगर : नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये आमदार भरणे यांनी इंदापूर तालुक्यासह राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी आवश्‍यक असलेल्या मागण्यांसाठी आक्रमक झाले. त्यांनी अधिवेशनामध्ये सात मागण्या मांडून मुख्यमंत्र्यांसह विधानसभेचे लक्ष वेधले. यातील काही मागण्यांसाठी तत्काळ निधी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे सांगितले. तर उर्वरीत मागण्या लवकरच पूर्ण करणार असल्याचे आश्‍वासने देण्यात आली.    

वालचंदनगर : नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये आमदार भरणे यांनी इंदापूर तालुक्यासह राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी आवश्‍यक असलेल्या मागण्यांसाठी आक्रमक झाले. त्यांनी अधिवेशनामध्ये सात मागण्या मांडून मुख्यमंत्र्यांसह विधानसभेचे लक्ष वेधले. यातील काही मागण्यांसाठी तत्काळ निधी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे सांगितले. तर उर्वरीत मागण्या लवकरच पूर्ण करणार असल्याचे आश्‍वासने देण्यात आली.    

नागपूर येथे नुकतेच हिवाळी अधिवेशन पार पडले. या अधिवेशनात भरणे आमदार झाल्यानंतर पहिल्यांदाच आक्रमक झाले होते. पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त असलेली ७१८ पदे भरण्याची मागणी केली. आरोग्य विभागामध्ये कर्मचाऱ्यांअभावी सर्वसामान्य नागरिकांना आरोग्यसेवा देण्यास अनेक अडचणी येत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आरोग्य सेवा देण्यासाठी यंत्रणा सज्ज असताना ही केवळ कर्मचारी नसल्यामुळे सर्वसाामन्य नागरिकांना खासगी दवाखान्यामध्ये उपचारासाठी जावे लागत असून, तातडीने रिक्त पदे भरण्याची मागणी लावून धरली. अधिवेशन संपताच रिक्त जागा भरण्याची कार्यवाही सुरु होईल, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. 

राज्यामध्ये घरकुल योजनेमध्ये गरिबांना घरकुले मंजूर होत आहेत. मात्र, त्यांच्याकडे जागा नसल्याने त्यांना लाभ घेण्यास अडचण येत असल्याने गायरानातील जागा करार पद्धतीने द्यावी व एक दोन गुंठे घरकुलासाठी खरेदी केलेल्या जागेची नोंद शासन दरबारी करावी अशी मागणी केली. ही मागणी पूर्ण झाल्यास सर्वांना हक्काचे घर मिळेल.

इंदापूर शहरामध्ये असलेले तालुका न्यायालयाची इमारत जुनी असून जीर्ण झाली आहे. न्यायालयासाठी भव्यदिव्य इमारतीची व पुणे येथे न्यायालयाचे खंडपीठ स्थापन करण्याची मागणी भरणे यांनी केली. इंदापूरमधील न्यायालयासाठी पुरेसा निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. इंदापूर तालुक्यातील बोराटवाडी  येथे नीरा नदीवर पूल बांधल्यास पुणे व सोलापूर जिल्ह्याला नागरिकांना शाळेतील मुलांना ये-जा करण्यास सोयीस्कर होईल. यामुळे 20 किमीचे अंतर वाचून दळणवळण सोयीस्कर होण्यासाठी मदत होणार असल्याने या पुलासाठी १६ कोटी रुपयांची तरतूद करण्याची मागणी भरणे यांनी केली. 

तसेच इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना वेळेमध्ये नीरा डाव्या कालव्याच्या पाण्याचे आवर्तन मिळावे, कालव्यात पाणी असून ही नियोजनाअभावी शेतकऱ्यांचे नुकसान होवू नये, यासाठी निमगाव केतकी येथे नव्याने सुरु करण्यात आलेल्या नीरा डाव्या कालव्याच्या पाटबंधारे विभागाअंतर्गतच्या उपविभागीय कार्यालयाच्या अंथुर्णे व निमगाव केतकीच्या शाखेसाठी प्रशासकीय इमारत व मंजूर असलेली ४८ रिक्त पदे भरण्याची मागणी भरणे यांनी लावून धरली.

संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ वृद्धापकाळ योजनेच्या अनुधानामध्ये वाढ करुन लाभार्थींना तीन ते चार हजार रुपये अनुदान देण्याची मागणी केली.

Web Title: marathi news local pune news winter session seven demanded MLA Bharane