वारकरी शिल्पामुळे बारामतीच्या सौंदर्यात पडणार भर

मिलिंग संगई
गुरुवार, 15 जून 2017

बारामती (जि. पुणे) - श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील पुण्यानंतरचे सर्वात मोठे मुक्कामाचे गाव म्हणून समावेश असलेल्या बारामतीच्या सौंदर्यात आता भर पडणार आहे. येत्या मंगळवारी वारकऱ्यांच्या पुतळ्यांचे उद्‌घाटन येत्या मंगळवारी (ता. 20) होणार आहे.

बारामती (जि. पुणे) - श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील पुण्यानंतरचे सर्वात मोठे मुक्कामाचे गाव म्हणून समावेश असलेल्या बारामतीच्या सौंदर्यात आता भर पडणार आहे. येत्या मंगळवारी वारकऱ्यांच्या पुतळ्यांचे उद्‌घाटन येत्या मंगळवारी (ता. 20) होणार आहे.

या पालखीसोहळ्याच्या मार्गावरील एक प्रमुख मुक्कामाचे ठिकाण म्हणून बारामतीकरांना नेहमीच अभिमान वाटत आला आहे. या सोहळ्याची वर्षभर कायम स्मृती राहावी व बाहेरगावाहून येणाऱ्यांनाही हे पालखी सोहळ्यातील प्रमुख गाव आहे, याची माहिती व्हावी या उद्देशाने एखाद्या शिल्पाची उभारणी बारामतीत व्हावी, अशी वारकरी संप्रदायातील भाविकांची मागणी होती. या मागणीचा विचार करुन बारामती नगरपालिकेने पालखीच्या स्वागताच्या ठिकाणी वारकऱ्यांची शिल्पे उभारली आहेत. या शिल्पांचे अंतिम काम सध्या वेगाने सुरु आहे. यामध्ये दिंडीतील वारकरी, विणेकरी, तुळशी वृदांवन घेतलेल्या महिला वारकरी अशी शिल्पे उभारण्यात आली आहेत. पाटस रस्त्याच्या चौकात पांढरीच्या महादेवाच्या मंदीरानजिक निसर्गरम्य वातावरणात ही शिल्पे साकारण्यात आली आहेत. येत्या 20 जूनरोजी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या शिल्पाकृतींचे उद्‌घाटन होत आहे.

नगरपालिकेने पाटस रस्त्यावर सुमारे एक कोटी पाच लाख रुपये खर्चुन उभारलेल्या 22 हजार चौरस फूटांचे अग्निशामन केंद्राचे उद्‌घाटन अजित पवार 20 जून रोजी करणार अहेत. या केंद्रात जमिनीखाली 25 हजार तर जमिनीवर 50 हजार लिटर क्षमतेच्या टाक्‍या उभारण्यात आल्या आहेत. याशिवाय कर्मचारी निवासस्थानाचीही येथे सुविधा करण्यात आली आहे. अजित पवार योंच्या पाठपुराव्याने या कामासाठी निधी प्राप्त झाला होता.

Web Title: marathi news maharashtra news warkari baratmati news pune news