'कॅन्स'च्या माध्यमातून कळतोय मधुमेहाचा हृदयावरील परिणाम 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 ऑगस्ट 2017

'सीएएन' (कार्डिओव्हॅस्क्‍युलर ऑटोनॉमिक न्युरोपथी) यावर हृदय आणि रक्तवाहिन्या यांना नियंत्रित करणाऱ्या मज्जातंतूवर दुष्परिणाम होतो. त्यामुळे हृदयाचे ठोके आणि रक्तवाहिन्यांमध्ये बिघाड निर्माण होतो. पण आता अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे आपण 'सीएनए'च्या प्रत्येक टप्प्यावर रुग्णाची 'ऑटोनॉमिक नर्व्हस सिस्टीम'ची तपासणी करू शकतो.

मधुमेहाचे दूरगामी परिणाम शरीरातील प्रमुख अवयवांवर होतात. त्यासाठी मधुमेही रुग्णांनी डोळे, मूत्रपिंड, पायाच्या रक्तवाहिन्या, हृदय यांची नियमित तपासणी करावी, असा सल्ला मधुमेहतज्ज्ञ देत असतात. मधुमेहाचा डोळ्यांवर, मूत्रपिंडावर, रक्तवाहिन्यांवर होणारा परिणाम आपल्याला वेगवेगळ्या वैद्यकीय चाचण्यांमधून दिसतो. हृदयाच्या तपासणीसाठी रुग्णाचा 'इलेक्‍ट्रोकार्डिओग्राम' (ईसीजी) काढला जातो. पण त्यातून मधुमेही रुग्णाच्या हृदयाची नेमकी कार्यक्षमता लक्षात येत नाही. ही कार्यक्षमता अचूकपणे तपासण्यासाठी नव तंत्राचा वापर करून 'कॅन्स' (कार्डियाक ऑटोमॅटिक न्यूरोपॅथी सिस्टिम्स) हे उपकरण विकसित करण्यात आले आहे. 

याबाबत माहिती देताना मधुमेहतज्ज्ञ डॉ. प्रशांत शिंदे म्हणाले, ''देशात मधुमेही रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जनजागृती हा प्रभावी मार्ग आहे. त्याच वेळी मधुमेहामुळे होणारी उपचारातील गुंतागुंतीही शास्त्रीय माहिती रुग्णांपर्यंत पोचविली पाहिजे. मूत्रपिंड, डोळे, पायाच्या नसा यावर मधुमेहाचा झालेला दुष्परिणाम नेमकेपणाने येतो. पण आता तितक्‍या अचूकतेने मधुमेहाचा हृदयावर झालेला परिणाम मोजण्यासाठी 'सीएएनएस' (कॅन्स) हे उपकरण महत्त्वाचे ठरले आहे.'' 

'सीएएन' (कार्डिओव्हॅस्क्‍युलर ऑटोनॉमिक न्युरोपथी) यावर हृदय आणि रक्तवाहिन्या यांना नियंत्रित करणाऱ्या मज्जातंतूवर दुष्परिणाम होतो. त्यामुळे हृदयाचे ठोके आणि रक्तवाहिन्यांमध्ये बिघाड निर्माण होतो. पण आता अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे आपण 'सीएनए'च्या प्रत्येक टप्प्यावर रुग्णाची 'ऑटोनॉमिक नर्व्हस सिस्टीम'ची तपासणी करू शकतो. या उपकरणाच्या माध्यमातून तपासणी करताना हृदयाची कार्यक्षमता तपासली जाते. त्यासाठी रुग्णाच्या सहा विशिष्ट क्रिया करतानाचे (जसे की, पूर्ण क्षमतेने हवा बाहेर टाकून श्‍वास रोखणे, एक उपकरण तीस सेकंदांपर्यंत दाबून ठेवणे, झोपेतून पटकन उठून उभे राहाणे) हृदयात होणारे बदल टिपण्यासाठी रुग्णाचा 'ईसीजी आणि रक्तदाब' तपासला जातो. या बदलाचे विश्‍लेषण संगणक प्रणालीवर एका विशिष्ट पद्धतीने व क्रमाने केले जाते. त्यानुसार निदान व पुढील उपचारांची दिशा निश्‍चित करणे सोपे जाते. या महत्त्वाच्या तपासण्यांमुळे आपल्याला मधुमेहाचा हृदयावरील परिणाम दिसतोच, पण लवकर निदान करता येते. त्यामुळे पुढील गुंतागुंत टाळता येते, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

Web Title: marathi news marathi website Diabetes