स्वतः तयार करा इकोफ्रेंडली गणेशमूर्ती 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 ऑगस्ट 2017

पुणे : बाप्पाची मूर्ती स्वतःच्या हाताने बनवा, तेही पर्यावरणपूरक साधनांनी. गणपतीची मूर्ती इकोफ्रेंडली बनवून पर्यावरणाचे रक्षण करूयात आणि आनंदात गणेशोत्सव साजरा करूयात. तर मग आजच सहभागी व्हा, 'सकाळ इको गणपती 2017' या कार्यशाळेत. वीस ऑगस्टला ही कार्यशाळा होणार आहे. 

पुणे : बाप्पाची मूर्ती स्वतःच्या हाताने बनवा, तेही पर्यावरणपूरक साधनांनी. गणपतीची मूर्ती इकोफ्रेंडली बनवून पर्यावरणाचे रक्षण करूयात आणि आनंदात गणेशोत्सव साजरा करूयात. तर मग आजच सहभागी व्हा, 'सकाळ इको गणपती 2017' या कार्यशाळेत. वीस ऑगस्टला ही कार्यशाळा होणार आहे. 

विद्यार्थ्यांमधील कलागुण विकसित व्हावेत, या उद्देशाने 'सकाळ'तर्फे हा उपक्रम राबविण्यात येत आहे. लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड सहयोगी प्रायोजक आहेत. ही कार्यशाळा नर्सरी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. रविवारी (ता. 20) सकाळी दहा ते साडेअकरा या वेळेत ही कार्यशाळा आयोजिली आहे. सिटी इंटरनॅशनल स्कूल (कोथरूड), पुणे सेंट्रल मॉल (कर्वे रस्ता), अभिरुची मॉल मल्टिप्लेक्‍स (सिंहगड रस्ता), एसएसएमएस सनविध इंग्लिश मीडियम स्कूल (पर्वती), नोव्हेल इंटरनॅशनल स्कूल (निगडी), सीएम इंटरनॅशनल स्कूल (बालेवाडी), ईस्ट कोर्ट- फिनिक्‍स मार्केट सिटी (विमाननगर), माउंट लिटेरा झी स्कूल (वाकड) या ठिकाणी ही कार्यशाळा होणार आहे. कार्यशाळेत सहभागी होण्याकरिता नावनोंदणी आवश्‍यक आहे. त्यासाठी 50 रुपये प्रवेश शुल्क आहे. ज्या विद्यार्थ्यांना या कार्यशाळेत सहभागी व्हायचे आहे, त्यांनी नावनोंदणी करावी. सोबत येताना कंपास पेटी, नॅपकिन, पाण्याची बाटली, जुने वर्तमानपत्र, बाऊल, ब्रश आणावेत. कार्यशाळेच्या ठिकाणी विद्यार्थ्यांना शाडू माती 'सकाळ'तर्फे देण्यात येईल. कार्यशाळेनंतर तयार केलेल्या गणेशमूर्ती विद्यार्थी घरी घेऊन जाऊ शकतील. सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळणार आहे. 

काय : सकाळ इको गणपती 2017 
कधी : रविवारी (ता. 20) सकाळी दहा ते 11 वाजून तीस मिनिटांपर्यंत. 
संपर्क : 8805009395 
व्हॉट्‌सऍप क्रमांक : 9146038033 

नावनोंदणीचे ठिकाण व वेळ :

  • पुणे सेंट्रल मॉल (कर्वे रस्ता) (दुपारी एक ते रात्री आठ) 
  • अभिरुची मॉल मल्टिप्लेक्‍स (सिंहगड रस्ता) (सकाळी अकरा ते सायंकाळी सात) 
  • एसएसएमएस सनविध इंग्लिश मीडियम स्कूल (सकाळी दहा ते दुपारी दोन) 
  • नोव्हेल इंटरनॅशनल स्कूल (निगडी) (सकाळी अकरा ते दुपारी तीन) 
  • सीएम इंटरनॅशनल स्कूल (बालेवाडी) (सकाळी दहा ते दुपारी चार) 
  • ईस्ट कोर्ट- फिनिक्‍स मार्केट सिटी (विमाननगर) (दुपारी चार ते रात्री आठ) 
  • नावनोंदणी 12 ते 17 ऑगस्टपर्यंत करावी
  • 13 व 15 ऑगस्ट रोजी सुटी असल्याने या दिवशी नावनोंदणी होऊ शकणार नाही. याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.
Web Title: marathi news marathi website Ganeshotsav Ganpati Utsav Pune Ganeshotsav