बिबट्याच्या हल्ल्यात दुचाकीस्वार जखमी

पराग जगताप
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

उदापूर (ता.जुन्नर जि.पुणे) : नगर कल्याण महामार्गावरुन चाललेला  दुचाकीस्वारावर डिंगोर गावच्या हद्दीत बिबट्याने हल्ला केला. यात तो दुचाकीस्वार जखमी झाला. सुदैवाने बिबट्याची झेप फसली व दुचाकीस्वाराच्या मांडीवर बिबट्याचा पंजाची तीन नखे लागली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

ही घटना काल (गुरुवार) रात्री 9 दरम्यान घडली. यात दुचाकीस्वार मनेश महादेव साळवे (वय 42, रा.पिंपळगाव जोगा ता.जुन्नर जि.पुणे) हा जखमी झाला आहे.

याबाबत वनविभागाकडून मिळालेली माहिती अशी, कि साळवे दुचाकीवरुन ओतूरकडून घरी पिंपळगाव जोगाला जात असताना नगर कल्याण महामार्गावर डिंगोरे गावच्या हद्दीत डिंगोरे व बनकरफाट्यामधील ओढ्यात बिबट्याने दुचाकीवर झेप घेतली. यात साळवेंना मांडीला बिबट्याच्या पंजाची तीन नखे लागून खोल जखम झाली.

वनविभागाला घटना समजताच त्यांना प्राथमीक आरोग्य केंद्र ओतूर व त्यानतंर पुणे येथिल शासकीय दवाखान्यात वनरक्षक  व्ही. आर. आडगळे, एस. ए. राठोड यांनी त्यास नेऊन बिबट प्रतिबंधक उपचार करुन शुक्रवारी पहाटे परत घरी आणून सोडले.

डिंगोरे व परिसरात बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Web Title: marathi news marathi website Junnar news pune news