निगडी स्मशानभूमी बनला मद्यपींचा अड्डा 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 ऑगस्ट 2017

पिंपरी : निगडी स्मशानभूमी सध्या मद्यपींचा अड्डा बनला आहे. येथील उघड्या डीपी बॉक्‍समुळे अपघाताचा धोका आहे, तर या परिसरातील खुर्च्याही तुटल्या आहेत; मात्र महापालिकेने या समस्यांकडे दुर्लक्ष केले आहे. 

बिजलीनगर, प्राधिकरण, निगडी, त्रिवेणीनगर आदी परिसरातील नागरिक अंत्यविधीसाठी निगडी स्मशानभूमीत येतात. पोलिसांपासून सुरक्षित स्थळ म्हणून स्मशानभूमी आता मद्यपींचा अड्डा बनला आहे. दहा ते पंधरा जणांनाचे टोळके नियमितपणे या परिसरात येऊन दारू पित असते.

येथे पडलेल्या रिकाम्या बाटल्यांच्या खचावरून या प्रकारास पुष्टी मिळत आहे. तसेच दारू पिल्यानंतर हे मद्यपी आपापसांत शिवीगाळ, तर कधी-कधी हाणामारीही करतात. तसेच दारू प्यायल्यानंतर बाटल्याही फोडतात. येथे पडलेल्या काचा लागून कर्मचारी जखमी होण्याची शक्‍यता आहे. 

या स्मशानभूमीचे देखभाल दुरुस्तीचे काम आरोग्य विभागाने ठेकेदारी पद्धतीने दिले आहे. दिवसा एक व रात्रीच्या वेळी एक असे दोनच सुरक्षारक्षक येथे तैनात असतात. मद्यपी जादा संख्येने असल्याने येथील सुरक्षारक्षकाने काही वेळा विरोध करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. काही वेळा पोलिसांनाही बोलविण्याचा प्रयत्न केला; मात्र तुमचं तुम्ही बघा, असे उत्तर पोलिसांनी दिल्याचे कर्मचारी सांगतात. तसेच येथील कर्मचाऱ्यांना तुमचे काम अंत्यविधी करण्याचे असल्याने दारूड्यांकडे लक्ष देऊ नका, असा सल्ला काही मनपाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व लोकप्रतिनिधीने दिल्याचे कर्मचारी सांगतात. 

या स्मशानभूमीत विद्युत दाहिनी असल्याने विद्युत रोहित्र व डीपी बॉक्‍सही आहे; मात्र डीपी बॉक्‍सला झाकण नसल्याने तो उघडाच आहे. याशिवाय आसपास गवत वाढले आहे. येथील खुर्च्या मद्यपींनीच दारू पिऊन तोडल्याचे कर्मचारी सांगतात; मात्र याबाबत कोणतीही फिर्याद दिलेली नाही. याशिवाय अनेक दारूडे बाहेर दारू प्यायल्यानंतर आराम करण्यासाठी परिसरात येतात. 

''सुरक्षारक्षक एकच असल्याने मद्यपी दादागिरी करतात; मात्र यापुढील काळात मद्यपी स्मशानभूमीत असल्यास पोलिसांना कळविण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा प्रशासनाचा विचार आहे.'' 
- विजय खोराटे, सहायक आयुक्‍त

Web Title: marathi news marathi website Nigdi