कडाचीवाडीतील दारू धंदा उद्‌ध्वस्त 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 ऑगस्ट 2017

चाकण : कडाचीवाडी (ता. खेड) येथे चाकण-शिक्रापूर रस्त्यावर गावठी दारूचा धंदा संतप्त होऊन आदिवासी ठाकर महिलांनी उद्‌ध्वस्त केला. तसेच तेथील साहित्याची तोडफोड केली. दारूचे प्लॅस्टिकचे ड्रम फोडून त्यातील दारू ओतून दिली. दारू विक्री करणाऱ्या महिलेला या महिलांनी चोप दिला.

"आमच्या ठाकरवस्तीवरील पोरं, आमचा नवरा दारू ढोसून मराया लागलाय. तुम्ही पोलिसाला पैसा देऊन धंदा करताय. हे बरं नव्हं. आम्ही सगळ बंद करणार हाय. दारू विकायची असलं तर तुमची गाठ आमच्याशी हाय,' असा सज्जड दम या महिलांनी दारू विक्री करणाऱ्यांना दिला. 

कडाचीवाडी गावच्या हद्दीत दारू धंदा अगदी रस्त्याच्या कडेला आहे. या धंद्यापासून काही अंतरावर आदिवासी ठाकरवस्ती आहे. या धंद्यामुळे ठाकरवस्तीवरील तरुण पोरं व पुरुष दारू पिण्यासाठी अहोरात्र या धंद्यावर असतात. दारू पिणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे महिलांना त्रास होऊ लागला आहे. हा धंदा बंद करावा, अशी मागणी पोलिसांकडे वारंवार करण्यात आली आहे; पण पोलिस कारवाई करून धंदा बंद करत नाही. आज सकाळी दहाच्या सुमारास सव्वाशे महिलांनी दारू विक्रीच्या ठिकाणवरील वस्तूंची तोडफोड केली. प्लॅस्टिकच्या टाक्‍या फोडल्या. ड्रम फोडले. दारू जमिनीवर ओतून दिली. 

या धंद्यामुळे शेजारील हॉटेलात तरुण मुलींच्या छेडाछेडीचे प्रकारही घडत आहेत, असे महिलांनी व तरुणींनी सांगितले. हॉटेलात काम करणारे जे तरुण आहेत, ते आदिवासी ठाकर मुलींची छेडछाड करतात. त्यांनाही आदिवासी तरुणांनी चोप दिला. त्यानंतर हॉटेलमधील तरुण पळून गेले. 

येथील दारू धंदा बंद केला नाहीतर आदिवासी ठाकर महिला पोलिस ठाण्यावर मोर्चा नेतील, असे सरपंच शांताबाई ठाकर, राजू ठाकर, शिवाजी ठाकर यांनी सांगितले. या वेळी माजी उपसरपंच बाळासाहेब कड उपस्थित होते.

Web Title: marathi news marathi website Pune News Chakan Shikrapur