पुण्यात स्वस्त मनुष्यबळ; बंगळूर, मुंबई व दिल्ली महागडी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 ऑगस्ट 2017

पुणे : कोणत्याही बड्या कंपनी किंवा स्टार्टअपमधील कर्मचाऱ्याला भेडसावणारा प्रश्‍न म्हणजे 'पगारवाढ' कधी आणि किती होणार? ती होणार नसेल, तर दुसऱ्या कोणत्या कंपनीत व शहरात मला अधिक पगार मिळेल, हे प्रश्‍न त्याला स्वाभाविकपणे पडतात. याची उत्तरे एका सर्वेक्षणात मिळाली आहेत. तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या प्रोफेशनल्सना सर्वाधिक पगार बंगळूर, मुंबई व दिल्ली या तीन शहरांमध्ये मिळतो आहे. त्या तुलनेत 30 टक्के स्वस्तातील मनुष्यबळ पुणे आणि 22 टक्के स्वस्त मनुष्यबळ चेन्नई शहरामध्ये उपलब्ध आहे. 

'कट शॉर्ट' या कंपनीने जानेवारी 2016 ते जून 2017 या 18 महिन्यांच्या कालावधीत केलेल्या 50 हजार प्रोफेशनल्सच्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली. सर्वेक्षणात सहभागी झालेले कर्मचारी सुमारे 11 हजारांहून अधिक कंपन्यांमध्ये काम करणारे होते. सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी दोन वर्षांपेक्षा कमी अनुभव असलेले 39.5 टक्के, दोन ते पाच वर्षे अनुभव असलेले 34 टक्के, पाच ते आठ वर्षे अनुभव असलेले 15 टक्के आणि आठ वर्षांपेक्षा अधिक अनुभव असलेले 11.5 टक्के कर्मचारी होते. 

सर्वाधिक पगार 'ई-कॉमर्स'मध्ये 
गेल्या पाच वर्षांत सर्वाधिक फंडिंग 'ई-कॉमर्स' क्षेत्रातील कंपन्यांना झाल्यामुळे या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना अन्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या तुलनेत 20 टक्के अधिक पगार मिळत असल्याचे सर्वेक्षणात दिसून येते. अशीच परिस्थिती वित्त-तंत्रज्ञान क्षेत्रात आहे; मात्र या क्षेत्रामध्ये विशिष्ट कौशल्य प्राप्त असलेल्या व्यक्तींनाच अधिक पगार आहे. शिक्षण- तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये फंडिंगसुद्धा कमी झाले आणि अनुभवसमृद्ध असलेल्या उच्चशिक्षित कर्मचाऱ्यांना तुलनेने कमी पगार मिळाले. तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना अन्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या तुलनेत 20 टक्के अधिक पगार मिळतो. तंत्रज्ञांप्रमाणेच मार्केटिंग क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनाही चांगला पगार मिळत आहे. 2016पर्यंत फंडिंग चांगले झाल्यामुळे त्याचा प्रभाव कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या पगारातही दिसून आला. 2016च्या अखेरीस फंडिंग कमी झाल्यामुळे त्याचाही प्रभाव कर्मचाऱ्यांच्या पगारात दिसून आला. 

तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रोफेशनल्सचा सरासरी वार्षिक पगार 

  • बंगळूर - 9.94 लाख रुपये 
  • चेन्नई - 7.81 लाख रुपये 
  • पुणे - 7.03 लाख रुपये 

बिगर-तंत्रज्ञान क्षेत्रातील सरासरी वार्षिक पगार 

  • बंगळूर - 9.15 लाख रुपये 
  • चेन्नई - 3.46 लाख 
  • पुणे - 6.43 लाख
Web Title: marathi news marathi website Pune News Pune Job Market