बक्षिसाच्या रकमेतून जलसंधारणाची आणखी कामे 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 ऑगस्ट 2017

निमगाव केतकी : ''मागील वर्षी पाणी फाउंडेशनच्या स्पर्धेत राज्यात प्रथम आलेल्या सातारा जिल्ह्यातील वेळू गावाला आम्हा ग्रामस्थांना सुनंदा पवार स्वतः घेऊन गेल्या होत्या. त्यांनी श्रमदानाचा मार्ग दाखविला, प्रेरणा- प्रोत्साहनाबरोबर आर्थिक पाठबळही दिले. यंदा आम्ही गावातील आबालवृद्ध एकत्र येऊन या स्पर्धेत सहभागी होऊन एकजुटीने श्रमदान केले. या कष्टाचे चीज झाले. आमच्या गावाला अठरा लाख रुपये मिळाले. यातून जलसंधारणाची आणखी कामे करणार आहे,' अशी भावना वॉटर कप स्पर्धेत इंदापूर तालुक्‍यात प्रथम आलेल्या घोरपडवाडीतील ग्रामस्थांनी व्यक्त केली. 

पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचा निकाल व बक्षीस वितरण रविवारी पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. या स्पर्धेत इंदापूर तालुक्‍यातील बारा गावांनी सहभाग घेतला होता. यात घोरपडवाडीने प्रथम क्रमांक पटकवला. या गावाला पाणी फाउंडेशनचे दहा लाख मिळाले. मुख्यमंत्र्यांनी सरकारकडून आठ लाख रुपये जाहीर केले. द्वितीय क्रमांक आलेल्या तक्रारवाडीस साडेसात लाख व तृतीय क्रमांक आलेल्या शेटफळगढेला पाच लाखांचा निधी सरकारच्या वतीने जाहीर झाला. 

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते घोरपडवाडीच्या सरपंच नंदाताई कांबळे, तुकाराम कांबळे, अण्णा धालपे, नितीन कुचेकर दीपक नाचण यांनी बक्षीस स्वीकारले. याबाबत सरपंच कांबळे व अण्णा धालपे म्हणाले, ''सुनंदा पवार यांनी आमचे गाव 'चला समृद्ध गाव घडवू या' या उपक्रमात मागील वर्षी दत्तक घेतले. त्यांच्या पुढाकारातून व प्रेरणेतून आम्ही जलसंधारणाच्या कामाला सुरवात केली. या यशात त्यांचा मोलाचा वाटा आहे. स्पर्धेच्या 45 दिवसांच्या कालावधीत श्रमदानातून 8375 घनमीटर, मशिनद्वारे एक लाख 24 हजार घनमीटर काम झाले. वृक्षारोपण, माती परीक्षण, जलबचत, विहीर पुनर्भरण ही कामे झाली. ग्रामस्थांसह शहरी भागातील नागरिकांनी, पदाधिकाऱ्यांनी श्रमदान केले.'' 

बालेवाडी (पुणे) : सत्यमेव जयते वॉटर कप 2017 च्या स्पर्धेतील इंदापूर तालुक्‍यातील प्रथम क्रमांकाचे बक्षीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते स्वीकारताना घोरपडवाडी ग्रामस्थ. 
..................................... 

Web Title: marathi news marathi website pune news Water Cup Indapur news