पोस्ट कार्डची राखी बांधून रक्षाबंधन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 ऑगस्ट 2017

पुणे : सायकल चालवत येणारा खाकी रंगाच्या कपड्यातील पोस्टमन काका, हे चित्र काळाच्या ओघात हरवतंय. संवादाची साधने नसणाऱ्या काळात पोस्टमन काकांमुळेच आपले प्रेम, जिव्हाळा आपल्या स्नेहिजनांपर्यंत पोचविणे शक्‍य होते. तंत्रज्ञानाच्या युगात त्यांच्या कार्याची ओळख नव्या पिढीला होण्यासाठी निरंजन सेवाभावी संस्थेने पोस्टमनकाकांसोबत रक्षाबंधन साजरे केले. त्यांच्या आयुष्यातील मुख्य घटक असणाऱ्या पोस्ट कार्डचीच आगळीवेगळी राखी बांधून रक्षाबंधन साजरे झाले. 

निरंजन सेवाभावी संस्थेच्या सिद्धीता गटाने मुख्य टपाल कार्यालयात पोस्टमनकाकांसोबत रक्षाबंधनाचे आयोजन केले होते. या वेळी उपडाकपाल अश्‍विनी पोतदार, वरिष्ठ डाकपाल आर. एस. गायकवाड, रेखा भळगट, डॉ. प्राजक्ता कोळपकर, शुभांगी धूत, पूनम राठी, रेश्‍मा भट्टड, पूजा पाटील, वैशाली कासट, प्राजक्ता डागा, भारती होले, अनिता मुंदडा, माधुरी तुपे, पूजा भुतडा आदी उपस्थित होते. या वेळी सर्व पोस्टमनकाकांना भेटवस्तूही देण्यात आल्या. 

शुभांगी धूत म्हणाल्या, ''आंतरदेशीय पत्र, पिवळसर पोस्ट कार्ड, लाल रंगाच्या पत्रपेट्या आणि पत्ररूपी संवादाच्या काळात पोस्टमनकाका आपल्या आयुष्यातील अविभाज्य घटक होते. पोस्ट खात्याचे काम कमी झाले असले तरी आजही अनेकदा पत्रव्यवहारासाठी पोस्टमनशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांच्यासमवेत रक्षाबंधन साजरे करण्यात आले.'' 

पोस्टमन गौतम वाव्हाळ म्हणाले, ''आजच्या काळात मोबाईलमुळे पत्रव्यवहार कमी झाला आहे. तरीही आमचा विचार करून आमच्यासोबत रक्षाबंधनाचा सण साजरा केला, याचा आम्हाला आनंद होत आहे. अनेक वर्षांपासून पोस्ट खात्यात मी काम करत आहे, त्यात या सेवेमुळे आज सार्थक झाले.''

Web Title: marathi news marathi website raksha bandhan Pune News Postman