अग्निशामक दलातील जवानांसोबत भाऊबीज 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 ऑक्टोबर 2017

पुणे : दिवाळीतही नागरिकांच्या संरक्षणार्थ भाऊबिजेपासून दूर असणाऱ्या अग्निशामक दलातील जवानांसोबत शनिवारी आगळ्या-वेगळ्या पद्धतीने भाऊबीज साजरी करण्यात आली. या भगिनींनी जवानांचे औक्षण करून त्यांच्या कामाविषयीची कृतज्ञता व्यक्त केली अन्‌ त्यांच्या कार्याला सलामही केला. 24 तास आपले कर्तव्य बजावणाऱ्या या अग्निशामक दलातील जवानांचा गौरवही करण्यात आला.

बहिणींनी केलेल्या ओवाळीने मन दाटून आल्याची भावना आणि या कार्यक्रमामुळे दुर्घटनांपासून शहराचे संरक्षण करण्याचे बळ मिळाल्याची भावना जवानांनी व्यक्त केली. 

'शंकरराव भोई स्मृती प्रतिष्ठान'तर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही 'अग्निशामक दलातील जवानांची भाऊबीज' हा उपक्रम दलाच्या मध्यवर्ती केंद्रात घेण्यात आला. पारंपरिक वेशभूषेत महिलांनी जवानांचे औक्षण करून त्यांच्यासोबत भाऊबीज साजरी केली. या कार्यक्रमात फायरमन राजीव टिळेकर आणि बाबू शीतकल यांना गौरविण्यात आले.

पालकमंत्री गिरीश बापट, राज्याच्या कारागृह विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. विठ्ठल जाधव, विशेष पोलिस महानिरीक्षक चंद्रशेखर दैठणकर, माजी आमदार उल्हास पवार, पोलिस उपायुक्त डॉ. सुधीर हिरेमठ, महापालिकेचे सहआयुक्त ज्ञानेश्‍वर मोळक, अभिनेत्री जयमाला इनामदार, अभिनेते सुनील गोडबोले, दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे, नगरसेवक अविनाश बागवे, विचारवंत अनिश चिश्‍ती, इक्‍बाल दरबार, तृतीयपंथी संघटनेच्या पन्ना गाबरेल आणि प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मिलिंद भोई या वेळी उपस्थित होते. यानिमित्ताने शिरखुर्माचा आस्वाद उपस्थितांनी घेतला. 

डॉ. जाधव म्हणाले, ''अग्निशमन ही तातडीची आणि महत्त्वाची सेवा आहे. आग विझविताना जवान जात-धर्म पाहत नाही. मोठ्या धाडसाने आपले कर्तव्य बजावतात. धोका पत्करून काम करतात. त्यांच्या कार्याला सलाम करायला हवा. मुंबई अग्निशामक दलाबरोबर पुण्यातील दलातही अत्यानुधिक सोयीसुविधा असाव्यात.'' 

रणपिसे म्हणाले, ''आज नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. इमारतीला आग लागली, की जीवित आणि वित्तहानी होतेच. पण जीवितहानी झाल्यावर आम्हा जवानांनाच त्या मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या नातेवाइकांना धीर द्यावा लागतो. अशावेळी डोळ्यांत पाणी आणू शकत नाही. हे काम करताना आमच्या जिवालाही धोका असतो. पण हे धाडस करावेच लागते. समाजातील प्रत्येकाने एकत्र येऊन जवानांचे मनोधैर्य वाढवले पाहिजे.''

Web Title: marathi news marathi websites Diwali 2017 Pune News