दिवाळी मुहूर्तावर वाहन खरेदीची धूम 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 ऑक्टोबर 2017

पुणे : दिवाळीच्या मुहूर्तावर यंदा दुचाकी आणि चारचाकी खरेदीत सुमारे 40 टक्‍क्‍यांनी वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. वसुबारस, धनत्रयोदशी, नरकचतृर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज या सहा दिवशीही वाहन खरेदी झाली आहे. 

सण-उत्सवाच्या मुहूर्तावर कंपन्यांनी दिलेल्या भरघोस सवलतींमुळे वाहन खरेदीकडे लोकांचा ओढा दिसला. युवक-युवतींची दुचाकीला पसंती मिळाली, तर काहींनी कुटुंबीयांसाठी चारचाकी खरेदी करण्याचा मुहूर्त गाठला, असे विक्रेत्यांनी सांगितले. विशेषतः धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन आणि पाडवा या तिन्ही दिवशी चांगला प्रतिसाद लाभला. 

चारचाकीचे विक्रेते कौशिक कोठारी म्हणाले, ''चारचाकी बुकिंगला यंदा चांगला प्रतिसाद होता. अनेकांनी दिवाळीला घरी चारचाकी आणण्याचा मुहूर्त साधला. यंदा चारचाकी खरेदीची धूम होती. खासकरून धनदत्रोदशी, लक्ष्मीपूजन, आणि पाडव्याला मोठ्या संख्येने वाहनांची खरेदी झाली.'' 

दुचाकी विक्रेते मंगेश परतानी म्हणाले, ''दिवाळीत यंदा सुमारे तीन हजार दुचाकींचे बुकिंग झाल्याचा अंदाज आहे. कंपन्यांनी दिलेली सूट आणि सवलतींमुळे मागणी वाढली आहे.'' 

नवरात्रापासूनच दिवाळीच्या मुहूर्तासाठी दुचाकीच्या बुकिंगला सुरवात झाली. यंदा वाहन खरेदीत 40 टक्‍क्‍यांनी वाढ पाहायला मिळाली. दुचाकी गाड्यांची विक्री मोठ्या प्रमाणात झाली. तर चारचाकी घेणाऱ्यांचेही प्रमाण वाढले आहे. दिवाळीत गाड्यांचा ताबा घेण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. 
- विक्रांत जगताप, दुचाकी विक्रेते

Web Title: marathi news marathi websites Diwali 2017 Pune News Automobile Sector