साहित्य संमेलन धार्मिक आश्रमात नकोच : रामदास फुटाणे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

राजकीय लोक संमेलनाला नको म्हंटले जाते, तसे धर्मांध लोकही नको म्हंटले पाहिजे. महामंडळाने निवडलेले स्थळ वादग्रस्त आहे. त्यामुळे स्थळाचा पुन्हा एकदा विचार व्हायला पाहिजे

पुणे : "लेखक हा कुठल्याही जाती-धर्माचा नसतो. तो माणसांचा प्रतिनिधी असतो. त्यामुळे साहित्य संमेलन कुठल्याही धार्मिक आश्रमात नकोच," अशी भूमिका वात्रटीकाकार रामदास फुटाणे यांनी घेतली आहे. संमेलन धार्मिक आश्रमातच घ्यायचे असेल तर मग बाबा राम रहिमचे आश्रम रिकामे झाले आहेच की, अशी टिपण्णीही त्यांनी केली.

बुलडाणा येथील हिवरा आश्रमात आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेण्याचा निर्णय साहित्य महामंडळाने घेतला आहे. हे वादग्रस्त ठिकाण आहे, असे सांगत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने महामंडळावर टीका केली आहे. त्यामुळे आगामी संमेलनाचा वाद आत्तापासूनच सुरु झाला आहे.

फुटाणे म्हणाले, "एका धर्माच्या आश्रमात संमेलन घेतले तर बाकीच्या धर्माचे लोक संमेलनाला कसे येणार? त्यामुळे संमेलन स्थळाची निवड करताना धार्मिक स्थळ टाळायलाच हवे होते. राजकीय लोक संमेलनाला नको म्हंटले जाते, तसे धर्मांध लोकही नको म्हंटले पाहिजे. महामंडळाने निवडलेले स्थळ वादग्रस्त आहे. त्यामुळे स्थळाचा पुन्हा एकदा विचार व्हायला पाहिजे."

Web Title: marathi news marathi websites Marathi Sahitya Sammelan ramdas phutane