पावसाचा दुष्काळी भागाला दिलासा 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 सप्टेंबर 2017

पुणे : यंदाच्या पावसाळ्यात ऑगस्टमधील शेवटच्या आठवड्यात पडलेल्या मुसळधार पावसाने पुणे जिल्ह्याला तारले. बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर व पुरंदर या दुष्काळी तालुक्‍यांना पावसाने दिलासा दिल्याची माहिती कृषी हवामान खात्यातर्फे प्रसिद्ध करण्यात आली आहे. जिल्ह्यात ऑगस्टमध्ये 121 टक्के पावसाची नोंद झाली. 

पुणे : यंदाच्या पावसाळ्यात ऑगस्टमधील शेवटच्या आठवड्यात पडलेल्या मुसळधार पावसाने पुणे जिल्ह्याला तारले. बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर व पुरंदर या दुष्काळी तालुक्‍यांना पावसाने दिलासा दिल्याची माहिती कृषी हवामान खात्यातर्फे प्रसिद्ध करण्यात आली आहे. जिल्ह्यात ऑगस्टमध्ये 121 टक्के पावसाची नोंद झाली. 

जिल्ह्यात यंदा मॉन्सूनचे दमदार आगमन झाले. जूनमध्ये सासवड, वेल्हे आणि हवेली या तालुक्‍यांचा अपवाद वगळता इतर सर्व तालुक्‍यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. जुलैमध्ये मात्र पाऊस कमी झाला. हवेली, मुळशी, भोर, मावळ, जुन्नर, खेड व आंबेगाव तालुक्‍यांमध्ये पावसाने सरासरी गाठली असली तरीही जिल्ह्यातील पुरंदर, दौंड, इंदापूर, बारामती, शिरूर तालुक्‍यांमध्ये पावसाने ओढ दिली होती. त्यामुळे ऑगस्टमध्ये पडणाऱ्या पावसाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, ऑगस्टचा शेवटचा आठवडा आला तरीही पावसाने हजेरी लावली नव्हती. त्यामुळे जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाल्याने ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात दमदार पाऊस पडला. त्यामुळे जिल्ह्यांमध्ये ऑगस्टच्या पावसाची सरासरी भरून निघाली, असे निरीक्षण कृषी खात्यातर्फे नोंदविण्यात आले आहे. 

दुष्काळी भागात दमदार हजेरी 
जुलैपाठोपाठ ऑगस्टमध्येही पावसाने विश्रांती घेतल्याने पुरंदर, दौंड, इंदापूर, बारामती, शिरूर येथे दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली होती. मात्र, ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात दमदार पाऊस पडला. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, खेड, आंबेगाव या भागांत पावसाचा जोर चांगल्या राहिल्याने या परिसरातील धरणांच्या पाण्याची पातळी वाढली. 

ऑगस्टमध्यापर्यंत 17 टक्के पावसाची नोंद 
पावसाने दडी मारल्यामुळे पुणे जिल्ह्यात 13 ऑगस्टला जेमतेम 17 टक्के पाऊस पडला होता. त्यापैकी शहरात 4.4 टक्के पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर शेवटच्या आठवड्यात हे चित्र बदलले आणि शहरात ऑगस्टच्या अखेरपर्यंत सरासरीच्या 148.9 टक्के पावसाची नोंद झाली. 

पुणे जिल्ह्यातील पाऊस (सरासरी आणि पडलेला पाऊस मिलिमीटरमध्ये) 
तालुका ......... जुलै ................................................ ऑगस्ट 
............. सरासरी ....... पडलेला पाऊस ... टक्केवारी ........... सरासरी ... पडलेला पाऊस... टक्केवारी 
पुणे शहर ... 168.9 .... 160.3 .......... 94.9 .............. 96.5 .......... 143.7 ..... 148.9 
हवेली ....... 168.9 .... 182 ............ 107.8 ..............96.5 .......... 89.9 ..... 93.2 
मुळशी ....... 680.1 .... 1205.6 ...... 177.3 ..............437.3 .........361.2 ... 82.6 
भोर .......... 381.7 .... 703.4 ......... 184.3 ..............237.7 ........ 290.6 ... 122.3 
मावळ .......494.4 ..... 1324.6 ....... 265.8 ..............305.8 .........712.5 .... 233 
वेल्हे ....... 1047.4 .... 862.2 ........ 82.3 ................ 679.9 .......... 310.5 ... 45.7 
जुन्नर ....... 250.6 ....... 494.2 ......... 197.2 .......... 147.5 .......... 252.6 ..... 171.3 
खेड ........ 186.4 ....... 362.1 ......... 194.3 ............ 114.7 ....... 235.5 ...... 205.3 
आंबेगाव ... 265.3 ....... 282.5 ......... 106.5 ............ 143.7 ........221.6 ..... 154.2 
शिरूर ...... 74.7 ......... 49.4 ............ 66.8 .............. 48.3 ..........152.1 ...... 314.9 
बारामती ... 56.7 ......... 40.4 ............ 71.3 .............. 67.4 ............ 81.1 ...... 120.3 
इंदापूर ..... 63 ......... 22.1 ................ 35.1 .............. 53.1 ........ 116.9 ...... 220.2 
दौंड ........ 60.2 ...... 21.5 ............... 35.7 ......... 46.7 .......... 153.5 ......... 328.7 
पुरंदर ........ 110.2 ..... 47.1 .............. 42.5 ........... 64 ............ 76.4 ......... 119.4 

(स्रोत : कृषी खाते, महाराष्ट्र राज्य)

Web Title: marathi news marathi websites Monsoon Maharashtra Pune news