विहरीत पडून मुलीचा मृत्यु

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 ऑक्टोबर 2017

पुणे : झाडाचे शिताफळ काढताना पाय घसरून शेजारील विहरीत पडून आठ वर्षाच्या मुलीचा बुडून मृत्यु झाल्याची दुर्देवी घटना उघडकीस आली. शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास वडकी येथील चाफेकर मळ्यात ही घटना घडली. विहिरीला कठडा नसल्याने ती थेट विहरीत पडली. याबाबत लोणीकाळभोर पोलिस ठाण्यात आक्समित मृत्यु झाल्याबाबतची नोंद करण्यात आली आहे. 

धनश्री अनिल खोमणे (वय ८ सध्या रा. चाफेकरमळा, वडकी, ता. हवेली, जी. पुणे, मुळगाव वेल्हे, ता. पुरंदर, जी. पुणे) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे. 

उरूळी देवाची पोलिस चौकीचे पोलिस उपनिरिक्षक राजू महानवर यांनी दिलेल्या माहितीनुसार, धनश्री तिसरीच्या वर्गात शिकत होती. तिचे आई-वडिल सोमनाथ मोडक यांच्या शेतात मोलमजूरी करतात.

हि विहिर दत्तात्रय नामदेव मोडक यांच्या मालकीची आहे. बराचवेळ मुलगी घरी आली नाही, त्यामुळे कुटूंबीयांनी तिची शोधाशोध सुरू केली. दरम्यान तेथील मुलांनी विहिरीत काही तरी पडले असल्याचे सांगितले. विहिर चाळीस फूट खोल आहे. त्यात पंचवीस फूट पाणी होते. त्यामुळे तातडीने हडपसर आग्निशामक बंब ला बोलविण्यात आले. फायरमन दत्तात्रय चौधरी, मारूती शेलार, अमित शिंदे यांनी अंधारात विहरीत उतरून दोरी व काटे तारेच्या सहाय्याने मुलीचा विहरीत शोध घेतला. तेव्हा धनश्री मृत अवस्थेत मिळून आली. शवविच्छेदनासाठी तिचा मृतदेह ससून रूग्णालयात पाठविण्यात आला आहे.

Web Title: marathi news marathi websites Pune News