पारंपरिक बासमतीच्या तुटवड्याची शक्‍यता 

representational image of Rice
representational image of Rice

पुणे : नवीन संकरित बासमतीची वाढती निर्यात, पारंपरिक बासमतीचे घटणारे उत्पादन यामुळे पुण्याच्या बाजारात मागणी असलेल्या पारंपरिक बासमती तुकडा या प्रकारातील तांदळाची उपलब्धता कमी होत आहे. पुढील काळात या तांदळाचा तुटवडा निर्माण होण्याची शक्‍यता आहे. 

भारत आणि पाकिस्तानातील पंजाब प्रांतात उत्पादित होणाऱ्या बासमती तांदळाला जगात मागणी असते. वाढत्या मागणीमुळे बासमतीच्या नवीन जाती शोधण्यासाठी संशोधनही झाले. या संशोधनानुसार कमी कालावधीत जास्त उत्पादन देणाऱ्या पुसा 1121, 1599, सुगंधा या नवीन जातींचे उत्पादन घेण्याचे प्रमाण वाढले आहे. 1121 चे साडेचार टन उत्पादन होते, तर 1599 चे साडेसहा टन उत्पादन होते. पारंपरिक बासमती तांदळाच्या उत्पादनास साडेतीन महिने लागतात आणि त्याचे प्रतिहेक्‍टरी उत्पादन साडेतीन टन होते. स्वाभाविकपणे नवीन जातीच्या तांदळाचे जास्त उत्पादन होत आहे. 

बासमती तांदळाच्या वैशिष्ट्यामुळे महाराष्ट्रातील बाजारपेठेत त्याचे स्थान चांगले आहे. विशेषतः बासमती तुकडा, मिनी दुबार, मोगरा, मिनी मोगरा, कणी या प्रकारच्या तांदळाला महाराष्ट्रात चांगली मागणी असते. पुण्यातही बासमती तुकडाला चांगली बाजारपेठ होती. एकूण तांदळाच्या उलाढालीत याचे प्रमाण 50 टक्के होते. गेल्या चार-पाच वर्षांत हे प्रमाण कमी होत चालल्याचे व्यापारी धवल शहा यांनी सांगितले. 
निर्यातीमध्येही पारंपरिक बासमतीचे प्रमाण घटत चालल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. पश्‍चिम आशिया, युरोप या देशांत पारंपरिक बासमतीची निर्यात होते. आखातामधील इराक, इराण, सौदी अरेबिया आदी देशांत 1121 आणि सेला बासमतीची निर्यात होते. 

संकरित बासमतीचे उत्पादन वाढल्याने त्याच्या तुकडा तांदळाची उपलब्धता वाढू लागली आहे. हा प्रकार "स्टीम' या नावाने ओळखला जातो. तुलनेत त्याला महाराष्ट्र व पुण्यात कमी मागणी आहे. पारंपरिक बासमतीचे उत्पादन कमी होत असल्याने त्याच्या तुकड्याचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे ग्राहक आंबेमोहोर, चिनोर, कोलम, लचकारी कोलम या बिगर बासमती तांदळाकडेही वळू लागले आहेत. 
- धवल शहा, तांदळाचे व्यापारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com