देशातील डॉक्‍टर आज काळा दिवस पाळणार 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 जानेवारी 2018

पुणे : राष्ट्रीय आरोग्य विधेयकाला विरोध करण्यासाठी देशातील डॉक्‍टर मंगळवारी (ता. 2) काळा दिवस पाळणार आहेत. त्यामुळे शहरातील बाह्यरुग्ण विभाग सकाळी सहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार असून, नियोजित शस्त्रक्रियाही पुढे ढकलल्या आहेत, अशी माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) पुणे शाखेचे अध्यक्ष डॉ. प्रकाश मराठे यांनी सोमवारी दिली. 

भारतीय वैद्यक परिषद (एमसीआय) बरखास्त करून राष्ट्रीय वैद्यक आयोग (एनएमसी) स्थापन करण्याचे विधेयक संसदेत मांडणार आहे. या विधेयकातून देशातील वैद्यकीय सेवेवर दूरगामी परिणाम होणार आहेत. त्यामुळे या विधेयकाला विरोध करण्यासाठी देशातील डॉक्‍टर मंगळवारी काळा दिवस पाळणार आहेत.

याबाबत डॉ. मराठे म्हणाले, ""ऍलोपॅथी डॉक्‍टरांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या संघटनेत प्रत्येक राज्याचे प्रतिनिधित्व होते. आता आयोगावर एका वेळी काही मोजक्‍याच राज्यांना प्रतिनिधित्व करता येणार आहे. त्यांचा कार्यकाल संपल्यानंतर त्या जागी इतर राज्यांतील प्रतिनिधींची नियुक्ती होईल. आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी अशा पॅथींचाही यात समावेश केला जाणार आहे. त्याला "आयएमए'ने विरोध केला आहे. तसेच, वैद्यकीय शाखेची पदवी घेतल्यानंतर त्याच्या नोंदणीसाठी "एक्‍झिट एझ्माम' घेऊ नये, अशी भूमिका आहे. त्यामुळे याला विरोध केला आहे.'' 

"आयएमए'च्या पुणे शाखेचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले, ""राष्ट्रीय आरोग्य विधेयकाला विरोध करण्यासाठी काळा दिवस पाळणार आहे. त्यामुळे सकाळी सहा ते संध्याकाळी सहा या वेळेत आपत्कालीन वैद्यकीय सेवा वगळता इतर सेवा बंद ठेवण्यात येतील. नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या आहेत. वैद्यकीय सेवेची गुणवत्ता या विधेयकामुळे कमी होणार आहे. त्यामुळे त्याला विरोध करण्यात येत आहे.''

Web Title: marathi news marathi websites Pune News Doctors strike