ज्येष्ठ साहित्यिक ह. मो. मराठे यांचे निधन 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 ऑक्टोबर 2017

पुणे : ज्येष्ठ साहित्यिक आणि पत्रकार ह. मो. मराठे (वय 77) यांचे आज (सोमवार) निधन झाले. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. 

'निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी' ही मराठे यांची पहिली कादंबरी होती. दैनिक गोमंतक, दैनिक लोकसत्ता, लोकप्रभा, मार्मिक, नवशक्ती अशा नियतकालिकांमध्ये त्यांनी लिखाण केले होते. 'किर्लोस्कर' मासिकाच्या संपादक मंडळातही मराठे यांचा समावेश होता. 

ह. मो. मराठे यांचा जन्म 2 मार्च 1940 रोजी झाला. सुरवातीच्या काळात त्यांनी कोल्हापूरमध्ये अध्यापनाचे काम केले. 'साधना' मासिकात प्रसिद्ध झालेल्या 'निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी' या कादंबरीमुळे त्यांची ओळख निर्माण झाली. 1972 मध्ये ही कादंबरी पुस्तक रुपाने प्रसिद्ध झाली होती. 

पाच वर्षांपूर्वी झालेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी मराठे यांनी अर्ज भरला होता. 'ब्राह्मणांना आणखी किती झोडपणार' या जुन्या लेखामुळे त्यांच्या उमेदवारीबद्दल वाद निर्माण झाला होता. त्यानंतर मराठे यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली होती. 

Web Title: marathi news marathi websites pune news H. M. Marathe