पुणे : स्वदेशीच्या घोषणांनी कर्वेनगर परिसर दुमदुमला

राजेंद्रकृष्ण कापसे
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

पुणे : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या शाळांनी 70व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी स्वदेशीचा स्वीकार करा या विषयावर विद्यार्थीनिंची रॅली काढण्यात आली होती. स्वदेशीच्या घोषणांनी कर्वेनगर परिसर दुमदुमला.

कर्वे संस्थेच्या शिशुविहार , आनंदीबाई कर्वे  व महिलाश्रमच्या या शाळांच्या २५० विद्यार्थिनी व 15 शिक्षक रॅलीत सहभागी झाल्या होत्या. रॅली काढण्यापूर्वी स्वदेशी वस्तू का वापराव्यात, परदेशी वस्तू वापरल्यामुळे आपल्या देशाला तोटा होतो. असे महत्त्व मुलींना सांगितले होते. जास्तीत जास्त स्वदेशी वस्तूंचा वापर करा, परदेशी वस्तू वापरू नका. अशा विषयांच्या घोषणा फलक, हाती घेतला होता. तसेच घोषणा देखील सुरू होत्या.

विद्यार्थिनींची रॅली, संस्थेच्या आवारातून सुरू झाली. कमिन्स कॉलेज रस्त्याने राजाराम पुलापर्यंत काढण्यात आली होती. तेथून पुन्हा संस्थेत आली. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर काढलेल्या रॅली चे नागरिकांनी स्वागत केले. 

महिलाश्रम च्या मुख्याध्यापिका विनिता पोळ, उपप्राचार्य सतीश पवार, शिशुविहार शाळेच्याच्या मुख्याध्यापिका मीनाक्षी खिरीड, आनंदीबाई कर्वे शाळेच्या मुख्याध्यापिका सविता रानडे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

Web Title: marathi news marathi websites Pune News Independence Day