कुटुंबासोबतच समाजहिताचा विचार करा : महापौर टिळक 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 ऑगस्ट 2017

पुणे : ''महात्मा गांधी म्हणायचे, की आपण सर्व जण आपापल्या कुटुंबासाठी धडपडत असतो. आपल्या प्रत्येक माणसाचे भले व्हावे, असे आपणास वाटते. खरेतर हाच हिताचा विचार समाजासाठी करण्याची गरज आहे,'' अशी अपेक्षा महापौर मुक्ता टिळक यांनी व्यक्त केली. 

विश्‍वशांती केंद्र (आळंदी), डॉ. विश्‍वनाथ कराड एमआयटी डब्ल्यूपीयू व शारदा ज्ञानपीठातर्फे 14 ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वांचा सत्कार सोहळा एमआयटीच्या ज्ञानेश्‍वर सभागृहात आयोजिला होता. या वेळी डॉ. विश्‍वनाथ कराड, डॉ. शां. ब. मुजुमदार, सनदी अधिकारी सागर डोईफोडे, प्रा. राहुल कराड, पं. वसंत गाडगीळ, श्रीवर्धन गाडगीळ उपस्थित होते. 

योगी ज्ञाननाथजी रानडे महाराज, रामकृष्ण गोविंद देशपांडे, प्राचार्य एच. एम. गणेशराव, प्राचार्य रामचंद्र पांडे, डॉ. गोविंद स्वरूप, श्रीकांत मोघे, शरद भिडे, पृथ्वीराज बोथरा, प्रभाकर जोग, निर्मलादेवी पुरंदरे, तुळशीराम दा. कराड, महादेव पाटील, ऍड. अनंत कुकडे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच व्यंग्यचित्रकार मंगेश तेंडुलकर यांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर करण्यात आला. 

महापौर टिळक म्हणाल्या, ''आज आपला देश तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो; मात्र याच तरुणाईस आज स्वत:च्या आई-वडिलांकडे पाहण्याइतपतही वेळ नाही.'' 

पं. गाडगीळ यांनी संस्कृतमध्ये प्रास्ताविकपर भाषण केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. मिलिंद पांडे यांनी केले, तर डॉ. एल. के. क्षीरसागर यांनी आभार मानले.

Web Title: marathi news marathi websites Pune News Mukta Tilak MIT