'पद्मावती'चे प्रदर्शन थांबवा; अन्यथा जाळपोळ करू : राजपूत समाज संघटनेचा इशारा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017

वाल्हेकरवाडी : 'संजय लीला भन्साळी यांच्या आगामी 'राणी पद्मावती' या हिंदी चित्रपटात पद्मावतीची कथा चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आली असून त्यामुळे हिंदू धर्मियांची भावना दुखावल्या आहेत' असा आरोप राजपूत समाज संघटनेतर्फे आज (शुक्रवार) पत्रकार परिषदेत देण्यात आला. 'या भावनांची शासनाने त्वरित दखल घेऊन चित्रपटाचे प्रदर्शन रद्द करावे अन्यथा चित्रपटगृहांवर हल्लाबोल करून जाळपोळ करू' असा इशाराही या संघटनेने दिला. 

'राणी पद्मावतींसह सोळा हजार राजपूत स्त्रियांनी जोहार केला होता. अशा पतिव्रता आणि हिंदू धर्माची शान राखणाऱ्या राणी पद्मावती यांच्याबाबत भन्साळी यांनी चित्रपटातून चुकीचा इतिहास दाखवून हिंदू धर्माची बदनामी केली आहे. यापूर्वीही काही विकृत चित्रपट निर्मात्यांनी हिंदू धर्माचा चुकीचा इतिहास दाखविणारे चित्रपट प्रदर्शित केले आहेत. भन्साळी यांनी 'पद्मावती'मधील चुकीचे दृष्य त्वरित वगळावे; अन्यथा हिंदू धर्मीय व राजपूत समाज संघटनांतर्फे चित्रपटगृहांवर हल्लाबोल व जाळपोळ करून चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही. झालेल्या सर्व परिणामांना शासन जबाबदार असेल', असा इशारा या संघटनेने काढलेल्या पत्रकाद्वारे देण्यात आला आहे. 

प्रसिद्धीपत्रकावर शिवकुमार बैस, नीता परदेशी,किशोर गिरासे, आबा राजपूत, भरत देशमुख, अड.दीप्ती राजपूत, अनिलसिंग बैस, जगदीश सिंग भानुजा,किरण ठाकूर,धीरज ठाकूर आदींच्या सह्या आहेत.

Web Title: marathi news marathi websites Pune News Pimpri Chinchwad News Padmavati