पीएमपी थांब्याला रिक्षांचा गराडा 

पीएमपी थांब्याला रिक्षांचा गराडा 

मुंढवा : खराडी येथील रक्षकनगर चौकातील बसथांब्याला रिक्षा स्थानकाचे स्वरूप प्राप्त झाले असून, बस प्रवाशांना वेड्यावाकड्या लागलेल्या रिक्षांतून मार्गकाढत बस पकडावी लागत आहे. येथील चित्र पाहता हा थांबा बस प्रवाशांसाठी आहे की रिक्षांसाठी, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. 

रिक्षाचालकांच्या चढाओढीमुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत असून, थांब्यावर बसची वाट पाहत थांबलेले शालेय विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिकांना बसमध्ये चढणे-उतरणेही अवघड बनले आहे. वाहतूक पोलिस मात्र बघ्याची भूमिका घेऊन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसतात. येथील गर्दीचा फायदा पाकीटमार व मंगळसूत्र चोरी करणारे उचलत असून, येथे चोरीच्या अनेक घटना घडल्या आहेत. 

ज्येष्ठ नागरिक रिक्षांमधून वाट काढत बसपर्यंत पोचण्यापूर्वीच बस निघून जात असल्याने नाहक रिक्षाने प्रवास करावा लागत असल्याचेही ज्येष्ठ नागरिक सांगत आहेत. बसथांब्यावर अनधिकृतपणे थांबणाऱ्या या रिक्षांवर त्वरित आणि कडक कारवाई करावी, अशी मागणीही प्रवाशांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com