विदेशी चलन देण्याचा बहाणा करून रिक्षाचालकाला एक लाख रूपयाला गंडा

संदीप जगदाळे
शनिवार, 7 ऑक्टोबर 2017

हडपसर : एका रिक्षाचालकास परदेशी चलनाच्या बदल्यात एक लाख रुपयांचा गंडा घालून दोन आरोपी फरार झालेले आहेत. याप्रकरणी  दोन आरोपींविरुद्ध आर्थिक फसवणुकीचा गुन्हा हडपसर पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. ही घटना शनिवारी ( ता. ७) सकाळी नउ वाजता हडपसर येथील पंडीत जवाहरलाल नेहरू भाजी मंडई येथे घडली.

हडपसर : एका रिक्षाचालकास परदेशी चलनाच्या बदल्यात एक लाख रुपयांचा गंडा घालून दोन आरोपी फरार झालेले आहेत. याप्रकरणी  दोन आरोपींविरुद्ध आर्थिक फसवणुकीचा गुन्हा हडपसर पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. ही घटना शनिवारी ( ता. ७) सकाळी नउ वाजता हडपसर येथील पंडीत जवाहरलाल नेहरू भाजी मंडई येथे घडली.

रिक्षाचालक मुस्तफा मेहबूब बागवान (वय ४०, रा. शिवनेरीनगर, कोंढवा) याने सलीम शेख व खालीद शेख (पूर्ण पत्ता माहित नाही) या दोन आरोपींविरुद्ध आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तीन ऑक्टोंबर रोजी रिक्षाचालक मुस्तफा याच्या रिक्षामध्ये सलीम हा प्रवासी म्हणून पुणे स्टेशनपासून शिवजीनगरपर्यंत गेला. सलीम याने रिक्षाचालकास भाडे दिले. तसेच त्याच्या जवळील एक विदेशी नोट देखील दिली. ही नोट कोठे चालते का पहा असे त्याने सांगितले. माझ्याकडे अशा हजारो नोटा आहेत. तुम्हाला जर हव्या असतील तर मला फोन करा असे सांगीतले. त्यानंतर दोघांनी एकमेकांचे मोबाईल नंबर घेतले. 

रिक्षाचालकाने नोटा बदलण्याच्या कार्यालयात चौकशी केली. तेव्हा नोट खरी असून त्याची भारतीय चलनात १२८० रुपये किंमत असल्याची खात्री झाली. पैशांच्या हव्यासापोटी रिक्षाचालकाने सलीम यास संपर्क साधला. तसेच मला विदेशी नोटा हव्या असल्याचे सांगितले. बुधवार ( ता. ४) पासून सलीम व त्याचा भाऊ खालीद हे रिक्षाचालकाच्या संपर्कात होते. आरोपींनी एक हजार परदेशी चलनाच्या नोटांच्या बदल्यात पाच लाख रुपयांची मागणी केली, मात्र इतके पैसे माझ्याकडे नाहीत. एक लाख रुपये असून नोटा बदलल्यानंतर चार लाख देतो असे रिक्षाचालकाने सांगितले. ते दोघांनी मान्य केले तसेच रिक्षाचालकाचा विश्र्वास संपादन केला.  

ठरल्यानुसार शनिवारी सकाळी रिक्षाचालक हडपसर भाजी मंडई येथे एक लाख रुपये घेऊन आला. दोन्ही आरोपी रिक्षामध्ये बसले. त्यांनी रिक्षा भाजी मंडईपासून काही अंतरावर एका अरूंद गल्लीत थांबवली. रिक्षाचालकांकडून एक लाख रुपये घेतले. एका प्लॅस्टिक कॅरीबॅगमधील कागदाचा त्यानंतर कॅरीबॅगेत विदेशी नोटा असून ती बॅग रिक्षाचालकाच्या हातात दिली. बॅग उघडून विदेशी चलन आहे, की नाही याची रिक्षाचालक खात्री करत होता. त्याचवेळी क्षणात दोघांनी एक लाख रूपयांसह धूम ठोकली. त्या बॅगेत रद्दी कागदांचे तुकडे पाहून रिक्षाचालकास आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. रिक्षाचालकाने हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. सहाय्यक फौजदार के. एस देशमुख पुढील तपास करीत आहेत.

Web Title: marathi news marathi websites Pune News Pune Crime News