अपहरण, खंडणीच्या घटनांमुळे सुरक्षिततेबाबत प्रश्‍नचिन्ह 

रविवार, 29 ऑक्टोबर 2017

पुणे : शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरात 'प्रोटेक्‍शन मनी'च्या नावाखाली व्यावसायिकांना धमकावून खंडणी उकळण्याचे प्रकार सुरू आहेत. गेल्या काही दिवसांत घडलेल्या अपहरण, खंडणीच्या घटनांवरून पोलिसांचा गुन्हेगारांवरील जरब कमी झाला असून, नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. 
सिंहगड रस्ता परिसरात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून खून करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली. या गंभीर घटनेमुळे शहरात खळबळ उडाली होती. तीन दिवसांनतर आरोपी पोलिसांच्या हाती लागला. 

पुणे : शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरात 'प्रोटेक्‍शन मनी'च्या नावाखाली व्यावसायिकांना धमकावून खंडणी उकळण्याचे प्रकार सुरू आहेत. गेल्या काही दिवसांत घडलेल्या अपहरण, खंडणीच्या घटनांवरून पोलिसांचा गुन्हेगारांवरील जरब कमी झाला असून, नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. 
सिंहगड रस्ता परिसरात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून खून करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली. या गंभीर घटनेमुळे शहरात खळबळ उडाली होती. तीन दिवसांनतर आरोपी पोलिसांच्या हाती लागला. 

सराईत गुन्हेगार संतोष ऊर्फ लुब्या चांदिलकर याने गणेश विसर्जनाच्या दिवशी उद्योजक सुहास बाफना यांचे खंडणीसाठी अपहरण केले. आरोपींनी त्यांच्याकडे 50 लाख रुपयांची खंडणी मागितली होती. काही दिवस ओलीस ठेवल्यानंतर आरोपीने त्यांची सुटका केली. त्यानंतर आरोपीला सांगली जिल्ह्यातील वाळवा येथून अटक करण्यात आली. खंडणीविरोधी पथकाने सांगलीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने ही कारवाई केली. 

निगडी येथून शाळकरी मुलगा ओम याचे 60 लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केले होते. आरोपी पुणे शहरात आणि बीड जिल्ह्यातील गेवराई येथे फिरत होते. ओम सुमारे 75 तास आरोपींच्या ताब्यात होता. पोलिस मागावर असल्याचे लक्षात आल्यानंतर आरोपींनी मुलाला सोडून दिले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आरोपींना अटक करण्यात आली. दरम्यान, शहरात गुन्हेगारी टोळ्यांनी पुन्हा डोके वर काढण्यास सुरवात केली आहे. रास्ता पेठेत बुधवारी सराईत टोळीतील गुन्हेगारांनी एका व्यावसायिकाला 'प्रोटेक्‍शन मनी' न दिल्यामुळे पिस्तूलचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच शहराच्या विविध भागांमध्ये काही गुंड पथारी व्यावसायिकांकडून 'हप्ता' वसुली करत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. 

खंडणीच्या अन्य काही घटना 

 • खडक परिसरातील सराईत गुन्हेगार अब्दुल गनी खान हा त्याच्या साथीदारांसह व्यावसायिकांना धमकी देऊन खंडणी वसूल करत होता. त्याच्यावर मोकांतर्गत कारवाई करण्यात आली. 
 • नांदेड सिटीतील वकिलीचे शिक्षण घेणाऱ्या आरोपीने व्हिडिओ क्‍लिप तयार करून खंडणी मागितली. 
 • निगडीत लग्नाचे आमिष दाखवून अनैतिक संबंध स्थापित करून महिलेला खंडणी मागितली. 
 • रास्ता पेठेत व्यावसायिकाकडे खंडणीची मागणी, समर्थ पोलिसांकडून दोघांना अटक 
 • पिंपरीत हातगाडीवाल्याकडे दोन हजार रुपये खंडणीची मागणी 

चालू वर्षातील घटना 

 • खंडणीचे एकूण गुन्हे 49 
 • उकल झालेले गुन्हे 48 
 • दोन हजारांपासून 50 लाखांपर्यंत खंडणीची मागणी 

अपहरणाचे गुन्हे 6 

अपहरणाचा बनाव रचल्याच्या तीन घटना 

 • हडपसर- अनोळखी व्यक्‍तीने 50 हजार रुपयांची खंडणी मागितल्याचा बनाव रचल्याचे उघड. काही वेळाने तो स्वत:च घरी परतला. 
 • समर्थ - डान्सबारमध्ये पैसे उडविल्यामुळे कर्जबाजारी झालेल्या व्यक्‍तीने अपहरणाचा बनाव 
 • डेक्‍कन - गुंगीचे औषध देऊन अपहरण केल्याची खोटी तक्रार 

पोलिसांकडून आवाहन 
गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाकडून काही व्यावसायिकांच्या बैठका घेण्यात आल्या. गुन्हेगाराने खंडणीची मागणी केल्यास संबंधित व्यक्‍ती अथवा व्यावसायिकांनी पोलिस ठाण्यात तक्रार द्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Web Title: marathi news marathi websites Pune News Pune Crime News