ज्येष्ठ उद्योगपती रसिकशेठ धारीवाल यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017

पुणे : ज्येष्ठ उद्योगपती आणि शिरूरचे माजी नगराध्यक्ष रसिकशेठ धारीवाल (वय ७८) यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी शोभा, मुलगा आणि शिरूरचे माजी नगराध्यक्ष प्रकाशशेठ आणि चार मुली असा परिवार आहे.

गेले काही दिवस ते आजारी होते. त्यातच त्यांचे निधन झाले. शिरूर तालुक्यातील बडे प्रस्थ म्हणून धारीवाल यांची ओळख होती. आधी तंबाखूचे व्यापारी आणि नंतर गुटखा उद्योजक म्हणून त्यांची ख्याती झाली. 

त्यांनी विविध क्षेत्रात आपल्या उद्योजकतेचा ठसा उमटविला होता. त्यांनी शिरूर विधानसभेची निवडणूक १९८० आणि १९८५ अशी दोन वेळा लढविली होती. शिरूर शहरावर त्यांचे अखेरपर्यंत राजकीय वर्चस्व होते. शिरूरचे ते २१ वर्षे नगराध्यक्ष होते. त्यांनी अनेक संस्था, व्यक्ती यांना मोठ्या प्रमाणात देणग्या दिल्या होत्या. जैन समाजातील अनेक संघटनांना त्यांनी सढळ हाताने मदत केली. शिरूरमध्ये त्यांनी रुग्णालयही उभारले. राज्यातील अनेक नेत्यांशी त्यांचा निकटचा संबंध होता.

Web Title: marathi news marathi websites Pune News rasiklal dhariwal