युवा जल्लोषात सासवडमध्ये शरद युवा महोत्सवाचे शानदार उदघाटन 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 डिसेंबर 2017

सासवड: बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या वतीने पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या शरद युवा महोत्सव या कार्यक्रमाचे उदघाटन आज (गुरूवार) पाच हजाराहून अधिक युवांच्या उपस्थितीत संपन्न झाले. याप्रसंगी उदघाटक म्हणून अभिनेते गिरीश कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.

गुणवंत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना भरारी मिळावी त्यांना स्वत:च्या हक्काचे व्यासपीठ लाभावे, या व्यासपीठावर आपली कला सादर करुन स्वत:ची ओळख निर्माण करावी या उद्देशाने ‘पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट’च्या वतीने ‘शरद युवा महोत्सव–२०१७’चे आयोजन करण्यात आले आहे.या महोत्सवात विविध स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थी कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळण्यास मदत होणार आहे. भोर, वेल्हा, मुळशी, हवेली आणि पुरंदर या तालुक्यातील तीन हजारहून अधिक स्पर्धक युवा सहभागी झालेले आहेत.

दि. १४ डिसेंबर रोजी वैयक्तिक गायन स्पर्धा, काव्यवाचन स्पर्धा, वैयक्तिक वाद्य वादन स्पर्धा होणार असून दि.१५ डिसेंबर रोजी वैयक्तिक नृत्य स्पर्धा, ढोल ताशा स्पर्धा, छायाचित्र स्पर्धा, समूह गायन स्पर्धा, समूह नृत्य स्पर्धा, वत्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, लघुपट निर्मिती स्पर्धा या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. आपल्यातील प्रतिभा एकमेकांच्या,साथीने जगाला दाखवून स्वत:ला सिध्द करावे, हा या महोत्सवाचा उद्देश आहे.

याप्रसंगी सासवड शहराचे सुपुत्र व संगीतसम्राट मालिकेचा विजेते प्रथमेश मोरे यांचे विशेष सादरीकरण याप्रसंगी करण्यात आले.

Web Title: marathi news marathi websites Pune News Saswad Sharad yuva mahotsav

फोटो गॅलरी