शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रयोगांची गरज : शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 ऑक्टोबर 2017

सांगवी : तरुण शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसायाकडे वळण्याची गरज आहे. शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय फायदेशीर होऊ शकतो. मात्र, त्यासाठी वेगवेगळे प्रयोग करण्याची गरज असल्याचा सल्ला माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी दिला. 

पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सांगवी (ता. बारामती) येथील संजय शंकरराव तावरे यांनी गीर गाईंचा प्रकल्प उभारला आहे. त्यास पवार यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांनी प्रकल्पाविषयी सविस्तर माहिती घेतली. या वेळी त्यांनी तरुण शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसायामध्ये योग्य ते प्रशिक्षण घेऊन यशस्वी शेतकरी व व्यावसायिक होण्याचा प्रयत्न करण्याचा सल्ला दिला.

येथील गोपालक संजय तावरे यांना पवार यांनी गेल्या दोन वर्षांपूर्वी गुजरात राज्याच्या धर्तीवर गीर गाईंचा प्रकल्प उभारण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार, तावरे यांनी उभारलेल्या मुक्त संचार गीर गाई प्रकल्पाची पवार यांनी पाहणी केली. या वेळी संजय तावरे यांनी गीर गाई दूध व्यवस्थापन, खाद्य, तसेच सेंद्रिय खत, गोमूत्र व्यवस्थापन याबाबत पवार यांना सविस्तर माहिती दिली. गीर गाईचे दूध हे मानवी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत पौष्टिक व फायदेशीर असल्याने त्यातून उपपदार्थांची निर्मिती करणार असल्याचे सांगितले.

तसेच सध्या सांगवी व बारामती येथे वितरित करण्यात येणारे गीर गाईचे दूध, दही, पनीर याची विक्री पुणे, मुंबईसारख्या शहरांमध्ये करून व्यवसाय वाढीचा प्रयत्न करणार असल्याची माहिती तावरे यांनी पवार यांना दिली. या वेळी माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष बाळासाहेब तावरे, सिद्धेश्वर संकुलाचे संस्थापक केशवराव जगताप, बारामतीचे माजी नगराध्यक्ष सदाशिव सातव, सांगवीचे माजी सरपंच अनिल तावरे, माळेगावचे माजी संचालक विजय तावरे, उद्योजक उदय चव्हाण, अनिल किसन तावरे, दीपक चव्हाण, शंकरराव तावरे, आदित्य तावरे आदी उपस्थित होते.

Web Title: marathi news marathi websites Pune News Sharad Pawar