वृद्ध कलावंतांचा सरकार विचार करणार : तावडे 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 जानेवारी 2018

पुणे : पुण्यातील वृद्ध कलावंत सरकारच्या 'कोटा' पद्धतीमुळे मानधनापासून उपेक्षित राहत आहेत. हा 'कोटा' वाढवून द्यावा किंवा इतर जिल्ह्याचा रिक्त 'कोटा' पुण्याला देण्यात यावा, असा प्रस्ताव जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत शितोळे यांनी राज्य सरकारकडे पाठवला आहे.

दरम्यान, या विषयावर नव्या आर्थिक वर्षात योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी 'सकाळ'ला सांगितले. 

आपले आयुष्य कलेसाठी समर्पित केलेल्या कलावंतांना निवृत्तीच्या काळात आनंदाने जगता यावे, म्हणून सरकारतर्फे मानधन दिले जाते; पण या मानधनापासून पुण्यातीलच अनेक कलावंतांना उपेक्षित राहावे लागत आहे. पुण्यात वृद्ध कलावंतांची संख्या जास्त आहे. त्यांच्याकडून अपेक्षेपेक्षा जास्त अर्ज येत असल्याने बहुतांश अर्ज बाजूला ठेवण्याची वेळ 'पुणे जिल्हा वृद्ध साहित्यिक-कलावंत निवड समिती'वर येत आहे. या पार्श्‍वभूमीवर, समितीचे अध्यक्ष आणि अभिनेते विक्रम गोखले यांनी पुण्यातील कलावंतांचा 'कोटा' वाढवून मिळावा, अशी मागणी सरकारकडे केली होती. याबाबतचे वृत्त 'सकाळ'मध्ये 23 डिसेंबर रोजी प्रसिद्ध झाले होते. याची दखल घेत शितोळे यांनी सरकारकडे 'कोटा' वाढवून देण्याबाबतचा प्रस्ताव पाठवला आहे. 

'कोटा' पद्धतीनुसार दरवर्षी साठ कलावंतांना मानधन प्रक्रियेत सामावून घेतले जाते; पण साठपेक्षा अधिक अर्ज येत असल्याने अनेक अर्ज बाजूला ठेवावे लागत आहेत. पुण्यात असे चित्र असले तरी काही जिल्ह्यांत साठही अर्ज येत नाहीत. त्यामुळे 'कोटा' रिक्त राहत आहे. रिक्त राहिलेला हा 'कोटा' पुण्याला द्यावा किंवा पुण्याचा 'कोटा' वाढवावा, असे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. या प्रस्तावाबरोबरच यंदासाठी निवडण्यात आलेल्या साठ कलावंतांची यादीही सरकारकडे पाठवली आहे. त्यांनाही नियमानुसार लवकरच मानधन मिळेल, असे शितोळे यांनी सांगितले.

Web Title: marathi news marathi websites pune news Vinod Tawade