शेतकऱ्यांनी विविध योजनांचा फायदा घ्यावा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जानेवारी 2018

मंचर : ''पुणे जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी अनेक योजना अनुदानासह राबवत आहे. पूर्वी 50 टक्‍के अनुदान दिले जात होते. त्यामध्ये वाढ केली असून, शेती अवजारांसह इतर योजनांसाठी 75 टक्‍के अनुदान केले आहे. शेतकऱ्यांनी योजनांचा फायदा घेऊन आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शेतीचे उत्पन्न वाढवावे. त्यासाठी ठिबक, तुषार सिंचन व मल्चिंग पेपरचा वापर करण्याकडे लक्ष केंद्रित करावे,'' असे आवाहन पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्‍वास देवकाते यांनी केले. 

मंचर (ता. आंबेगाव) येथे बुधवारी (ता. 10) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आंबेगाव तालुका शेतमाल प्रक्रिया संघाने भरविलेल्या जिल्हास्तरीय कृषी प्रदर्शनाचे उद्‌घाटन देवकाते यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील होते. या वेळी आंबेगाव तालुका पंचायत समितीच्या सभापती उषा कानडे, बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, भीमाशंकर कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब बेंडे, शेतमाल प्रक्रिया संस्थेचे अध्यक्ष भगवानराव सिनलकर, पुणे जिल्हा बॅंकेच्या संचालिका डॉ. वर्षा शिवले, जिल्हा परिषद सदस्या अरुणा थोरात, सचिन भोर, सुषमा शिंदे, बाबूराव बांगर, शांताराम हिंगे, रमेश खिलारी, शांताराम थोरात उपस्थित होते. 

विवेक वळसे पाटील म्हणाले, ''शेतकरी प्रदर्शनाचा फायदा या भागातील शेतकऱ्यांना होत असल्याने शेतकऱ्यांचा प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळतो. अधिक एकरी शेतीमालाचे उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांनी येथे स्टॉल उभारले आहेत.'' 

शेतकरी कृषी प्रदर्शनाचे मुख्य संयोजक महेश मोरे म्हणाले, ''रासायनिक खते व औषधांचा वापर टाळून सेंद्रिय खते वापरून शेतीमाल घेण्याकडे शेतकऱ्यांनी लक्ष केंद्रित करावे. या उद्देशाने सेंद्रिय खतांचे भाग्यलक्ष्मी डेअरी फार्मसह अनेक स्टॉल येथे उभारले आहेत. पहिल्याच दिवशी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. महिला बचत गटांच्या मासवडी, मासे, तांबडा व पांढरा रस्सा आदी खाद्य पदार्थांच्या स्टॉलवर रेलचेल वाढली आहे.'' नीलेश पडवळ यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: marathi news marathi websites Pune News Vishwas Devkate