राजकारणात प्रवेश करणार नाही - मीरा कलमाडी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जानेवारी 2018

पुणे - ""आपण कोणत्याही परिस्थितीत राजकारणात प्रवेश करणार नाही; परंतु सामाजिक कार्य सुरूच ठेवणार असून, जनतेची शक्‍य तितकी सेवा करणार आहे,'' असे माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्या पत्नी मीरा यांनी मंगळवारी एका कार्यक्रमात स्पष्ट केले. 

मीरा कलमाडी कॉंग्रेसच्या उमेदवारीवर पुण्यातून लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत, अशी चर्चा कॉंग्रेस वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. त्यावर मीरा कलमाडी यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. प्रदेश कॉंग्रेसचे सचिव संजय बालगुडे यांनी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी व दिवंगत मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दीनिमित्त 31 ऑक्‍टोबर ते 14 नोव्हेंबरदरम्यान शहरात 100 ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केले होते. या शिबिरांतून सुमारे 1800 बाटल्या रक्तसंकलन झाले. शिबिराचे संयोजक व कार्यकर्त्यांचा मीरा यांच्या हस्ते सत्कार झाला. त्या प्रसंगी त्यांनी भूमिका स्पष्ट केली. अभय छाजेड, डॉ. सतीश देसाई, सदानंद शेट्टी आदी उपस्थित होते.

Web Title: marathi news meera kalmadi suresh kalmadi politics