विकासासाठी सुविधांवर भर - आमदार जगताप

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 मार्च 2018

पिंपरी  - ‘‘रस्ते, वाहतूक व्यवस्था या शहराच्या रक्तवाहिन्या असतात. त्यामुळे ही व्यवस्था सक्षम ठेवणे गरजेचे आहे. शहराच्या परिपूर्ण विकासासाठी आवश्‍यक सुविधा देण्यावर आमचा भर आहे,’’ असे प्रतिपादन आमदार लक्ष्मण जगताप यांनी केले. 

पिंपरी  - ‘‘रस्ते, वाहतूक व्यवस्था या शहराच्या रक्तवाहिन्या असतात. त्यामुळे ही व्यवस्था सक्षम ठेवणे गरजेचे आहे. शहराच्या परिपूर्ण विकासासाठी आवश्‍यक सुविधा देण्यावर आमचा भर आहे,’’ असे प्रतिपादन आमदार लक्ष्मण जगताप यांनी केले. 

महापालिकेतर्फे बिजलीनगर येथे उभारण्यात येणारा भुयारी मार्ग (अंडरपास), केशवनगर-काळेवाडी रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचा दुसरा टप्पा, चिंचवड-काळेवाडी पुलापासून भाटनगर मलनिस्सारण प्रकल्पापर्यंत प्रस्तावित १८ मीटर विकास आराखड्यातील रस्ता आदी प्रमुख कामांचे भूमिपूजन जगताप यांच्या हस्ते झाले. तर, चिंचवडगाव येथील लॉन टेनिस क्रीडांगणाचे लोकार्पण करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. महापौर नितीन काळजे, स्थायी समितीच्या मावळत्या अध्यक्षा सीमा सावळे, ‘ब’ प्रभाग अध्यक्ष सचिन चिंचवडे, नगरसेवक नामदेव ढाके, राजेंद्र गावडे, बाळासाहेब ओव्हाळ, सुरेश भोईर आदी उपस्थित होते. 

काळजे म्हणाले, ‘‘शहरातील विविध भागांतील विकासकामांतून नागरिकांना चांगल्या सुविधा मिळतील. चिंचवडगाव येथे प्रस्तावित असलेल्या रस्त्यामुळे नागरिकांचा मार्ग सुखकर होईल.’’ ढाके म्हणाले, ‘‘बिजलीनगर येथील चौकात छोटे-मोठे अपघात होत होते. अनेक वर्षांपासून येथे भुयारी मार्ग करण्याची मागणी होती. ती पूर्ण होणार आहे.’’ नगरसेवक गावडे यांनी चिंचवडगाव येथील विविध कामांची माहिती दिली.

Web Title: marathi news MLA laxman jagtap pimpri