जुन्नर: आदिवासी युवक रोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद 

दत्ता म्हसकर
शनिवार, 17 मार्च 2018

जुन्नर - एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, घोडेगांव ता.आंबेगाव, आदिवासी समाज प्रबोधिनी व आदिवासी विकास समितीच्या वतीने आदिवासी समाजातील बेरोजगार युवकांसाठी आयोजित रोजगार मेळाव्यास चांगला प्रतिसाद मिळाल्याचे प्रबोधिनीचे विश्वस्त नाना साबळे व तानाजी तळपे यांनी सांगितले. या मेळाव्यात चारशेहून अधिक बेरोजगार युवक उपस्थित होते.  जिल्ह्यातील चाकण आणि रांजणगाव येथील विविध कंपन्यांच्या स्टॉलवर उमेदवारांची नोंदणी करण्यात आली तसेच मुलाखती घेण्यात आल्या. याप्रसंगी सीताराम जोशी, प्रकल्प कार्यालयाचे दादाभाऊ लोहकरे, एस. आर. इंगळे आदीनी मार्गदर्शन केले.

ग्रामीण भागातील रोजगार मेळाव्याचा हा पहिलाच प्रयत्न होता. मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असल्याने यापुढेही आदिवासी भागातील युवकांना रोजगारबाबत मार्गदर्शन करण्याचे काम प्रकल्प अधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प कार्यालय करणार आहे. मेळावयानंतर संबंधित कंपन्यांचा पाठपुरवठा करून जलदगतीने गरजूंना रोजगार मिळवून देणार असल्याचे सांगण्यात आले.  

याप्रसंगी नाना साबळे, तान्हाजी तळपे, सुनील विरणक, मोहन लांडे, सुभाष मोहरे, रभाजी काठे, मालती रासकर आणि ग्रामीण भागातील युवक-युवती मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

Web Title: marathi news Mobilize tribal employment