पालिका भ्रष्टाचाराबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलू 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 मार्च 2018

पिंपरी - पिंपरी-चिंचवड पालिकेत गेल्या वर्षी झालेल्या सर्व भ्रष्टाचारांची चौकशी करण्याची मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करू, असे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ मंगळवारी विखे पाटील यांना मुंबईत भेटले. या शिष्टमंडळात साठेंबरोबर कॉंग्रेस सेवादलाचे शहराध्यक्ष संग्राम तावडे, मावळ युवा अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, पिंपरी ब्लॉक अध्यक्ष बाळासाहेब साळुंखे, शहर सरचिटणीस क्षितिज गायकवाड, एनएसयूआयचे शहराध्यक्ष विशाल कसबे, बाळासाहेब साळवे आदी उपस्थित होते.

पिंपरी - पिंपरी-चिंचवड पालिकेत गेल्या वर्षी झालेल्या सर्व भ्रष्टाचारांची चौकशी करण्याची मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करू, असे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ मंगळवारी विखे पाटील यांना मुंबईत भेटले. या शिष्टमंडळात साठेंबरोबर कॉंग्रेस सेवादलाचे शहराध्यक्ष संग्राम तावडे, मावळ युवा अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, पिंपरी ब्लॉक अध्यक्ष बाळासाहेब साळुंखे, शहर सरचिटणीस क्षितिज गायकवाड, एनएसयूआयचे शहराध्यक्ष विशाल कसबे, बाळासाहेब साळवे आदी उपस्थित होते. पिंपरी-चिंचवड मनपामधील गैरकारभाराविषयी माहिती देणारे निवेदन साठे यांनी विखे पाटील यांना यावेळी दिले. या निवेदनात 

प्रस्तावित पाणीपट्टी वाढ, कचरा उचलण्याच्या निविदेतील भ्रष्टाचार, टीडीआर आणि पंतप्रधान आवास योजना निविदेतील भ्रष्टाचार याबाबत माहिती देण्यात आली आहे. महापालिकेने प्रस्तावित केलेली पाणीपट्टीमधील दरवाढ म्हणजे महागाईने पिचलेल्या सर्वसामान्यांना खाईत ढकलण्याचा प्रकार आहे. 

रस्ते विकासासाठी तब्बल 425 कोटी रुपयांच्या कामाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. या कामामध्ये सत्ताधारी भाजपने सुमारे 45 कोटींचा भ्रष्टाचार केल्याची चर्चा आहे. 

तसेच कचरा वाहतूक निविदेतही सुमारे 252 कोटींचा जादा खर्च  करून गैरव्यवहार होण्याची शक्‍यता आहे. तसेच पालिकेने मागील आठ महिन्यांच्या कालावधीत तब्बल 41 लाख 27 हजार चौरस फुटांचे टीडीआरचे वाटप केले असून, त्याची किंमत 5300 कोटी रुपये आहे. यामध्येही आयुक्‍त आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी मोठा भ्रष्टाचार केला आहे. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरबांधणी प्रकल्पांसाठी काढलेल्या निविदा प्रक्रियेची चौकशी व्हावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. यावेळी पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ताधाऱ्यांकडून सुरू असलेला भ्रष्टाचार आणि प्रस्तावित केलेली पाणीपट्टी दरवाढ मागे घेण्याबाबत व इतर प्रश्नांबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्याबरोबर बैठक घेऊन चर्चा करू, असे आश्‍वासन विखे पाटील यांनी या शिष्टमंडळाला दिले.

Web Title: marathi news Municipal corruption PCMC congress