अपंगत्व प्रमाणपत्राबाबत आयुक्तांकडून आदेश

Wheelchair_symbol.
Wheelchair_symbol.

हडपसर : अपंगत्वाचे ऑनलाईन प्रमाणपत्र वितरणाबात अनेक तक्रारी आहेत. त्या अनुषंगाने अपंगकल्याण आयुक्तांनी अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी सर्व जिल्हा रूग्णालयांच्या अधिष्ठातांना मार्गदर्शक तत्वांबाबत स्वतंत्र परिपत्रक जारी केले आहे. जिल्हा रूग्णालयांमधून ऑनलाईन प्रमाणपत्र मिळणेसाठी जाणा-या दिव्यांग व्यक्तीस रूग्णालयातील कर्मचा-यांकडून तुच्छ वागणूक दिली जात असल्याच्या तक्रारी आयुक्त कार्यालयाकडे आल्याने आयुक्तांनी हे परिपत्रक जारी केले आहे. 

परिपत्रकामध्ये प्रमाणपत्र काढण्यासाठी आलेल्या दिव्यांग व्यक्तींसाठी रूग्णालयात मदत कक्ष स्थापन करणे, सदर कक्षात एक खिडकी योजनेअंतर्गत दाखले मिळण्याकरीता शुल्क भरणे, व इतर टेस्ट करीता शुल्क स्विकारणे, रिपोर्ट त्याच खिडीकीद्वारे दिले जावेत. हा कक्ष रूग्णालयाच्या मुख्य दरवाजाजवळच असावा. ज्या रूग्णालयात लिफ्टची सुविधा नाही तेथे तळमजल्यावरच प्रमाणपत्रासाठी तपासणी करण्याची सोय करावी. रूग्णालयात लाभार्थ्यांसाठी व्हिलचेअर व मदतनीसाची सुविधा उपल्बध करावी.

 जे कर्मचारी अथवा अधिकारी दिव्यांग व्यक्तींशी असभ्य वर्तन करतील अशा व्यक्तिंविरूध्द तक्रार आल्यास त्याची चौकशी करून महाराष्ट्र नागरी सेवेतील तरतूदीप्रमाणे कर्मचारी अथवा अधिका-यांच्या गोपनीय शे-यात व सेवा पुस्तकात नोंद करावी. रूग्णालयात आलेल्या लाभार्थ्यांना रांगेत उभे करू नये. त्यासाठी वेटींग रूमची स्थापना करावी व तेथे पुरेशी आसन व्यवस्था ठेवावी. रूग्णालयात दिव्यांगासाठी स्वच्छ व अडथळा विरहीत मुक्त संचार करता येईल असे वातावरण असावे. मदत कक्ष व प्रतिक्षालय येथे दर्शनीय स्थळी ठळकपणे अपंग प्रमाणपत्र मिळविण्यासाठीच्या प्रकीयेचे फलक लावावेत. 

तपासणी झालेल्या दिव्यांग व्यक्तीला शक्यतो त्याच दिवशी प्रमाणपत्र दिले जावे. रूग्णालयातील वरिष्ठ अधिकारी जर दिव्यांग व्यक्तीच्या तक्रारीची दखल घेत नसतील तर समाजकल्याण अधिकारी, उपनगराकरिता सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण यांच्यामार्फत आयुक्त अपंग कल्याण यांच्याकडे तक्रार अर्ज करावेत. 

अपंग कल्याण आयुक्तालयास असा तक्रार अर्ज प्राप्त झाल्यानंतर आयुक्त हे अपंग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ मधील कलम ८०  व ८२ नुसार न्यायिक प्रकीया अवलंबतील व आयुक्तांचा आदेश अंतिम राहिल. दिव्यांग व्यक्ती प्रमाणपत्र व इतर सोयी-सविधांसाठी रूग्णालयात आलेल्या दिव्यांग व्यक्तींना सर्वतोपरी सहकार्य करण्याची प्रथम जबाबदारी रूग्णालय प्रमुखाची राहील असे अपंगकल्याण आयुक्त ज्ञा. ल. सुळ यांनी या परिपत्रकात नमूद केले आहे.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com