गणेश जयंती ; ओझरला फुलांचा वर्षाव, मोरया गोसावींची गायली पदे

दत्ता म्हसकर
रविवार, 21 जानेवारी 2018

जुन्नर: अष्टविनायकांपैकी श्री क्षेत्र ओझर ता.जुन्नर येथे माघ शुद्ध चतुर्थीनिमित्त गणेश जयंती सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. फुलांचा वर्षाव करून भक्तीमय वातावरणात मोरया गोसावींची पदे म्हणत गणेश जयंती साजरी करण्यात आली.

जुन्नर: अष्टविनायकांपैकी श्री क्षेत्र ओझर ता.जुन्नर येथे माघ शुद्ध चतुर्थीनिमित्त गणेश जयंती सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. फुलांचा वर्षाव करून भक्तीमय वातावरणात मोरया गोसावींची पदे म्हणत गणेश जयंती साजरी करण्यात आली.

पहाटे ५ वाजता मंदिर उघडण्यात येऊन श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शाकुजी यशवंत कवडे, उपाध्यक्ष सुर्यकांत रवळे, सचिव गोविंद कवडे, खजिनदार किसन मांडे, विश्वस्त बाळासाहेब कवडे, विक्रम कवडे, प्रकाश मांडे, पी. बी जगदाळे, देविदास कवडे ,बबन मांडे, साहेबराव मांडे, अनिल मांडे, शंकर कवडे आणि ग्रामस्थ अविनाश जाधव यांनी अभिषेक करून मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. प्रथेनुसार सकाळी १० वाजता गणेशाच्या पालखीने नगर प्रदक्षिणा घालून ओझर येथील जगदाळे मळ्यात आंबेराई या ठिकाणी प्रस्थान झाले. या ठिकाणी पृर्थ्वी सूर्य पूजा करून चौथाद्वार साजरा करण्यात आला.

दरम्यानच्या काळात गणेश मंदिरात ह.भ.प विकास महाराज हगवणे गिरवली यांचे गणेश जन्माचे कीर्तन झाले. गणेश पालखीचे आगमन मंदिरात दुपारी १२.१० वाजता होऊन  ह.भ.प.भालचंद्र ठमुजी कवडे, विठ्ठलबाबा मांडे, भालचंद्र रवळे, श्रींचे पुजारी हेरंभ जोशी, विघ्नहर राजेंद्र जोशी, मंगेश जोशी, देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त ग्रामस्थ व हजारो भाविकांच्या उपस्थित महान साधू मोरया गोसावी यांच्या पदांचे गायन करत एक वाजता गणेश जन्म सोहळा साजरा करण्यात आला. रोहिदास मांडे यांनी मंदिरास फुलांची सजावट केली होती.

ट्रस्टमार्फत भाविकांना बैठक व्यवस्था दर्शन रांगेवर छत, पार्किंग, देणगी कक्ष इत्यादींची चोख व्यवस्था होती. मंदिर परिसरात खेळणी, झोपाळे, दुकानांमुळे यात्रेचे स्वरूप आले होते. जन्मोत्सवाचे थेट प्रसारण मंदिर परिसरात व बाहेर एलईडीमार्फत करण्यात आले.

आजच्या दिनाचे औचित्य साधून प्रवीण अनंदराव चौघुले, आळेफाटा, जयंत म्हैसकर, अंधेरी,दिपक अनंत जगदाळे, आळेफाटा, विद्याताई कंक,पुणे,  चेतन पाटील ,धुळे.यांनी अन्नदान केले.

दर्शनासाठी लक्ष्मणराव दुर्गे ,भानुसाद सातकर ,भागवत साहेब,विनोद पवार ,आशुतोष मेहेर ,सुनील शेटे,रेणू तिवारी,कलेक्टर मध्य प्रदेश,सुरेश वर्मा ज्वेलर्स दिल्ली ,पावन गाडेकर व टीम आपला आवाज यांचा समावेश होता. गर्दीचे नियोजन व्यवस्थापन देवस्थान ट्रस्टचे कर्मचारी ,ग्रामस्थ व ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक व कर्मचारी तसेच विश्वस्तांनी केले.

Web Title: Marathi news ozar news junnar news ganesh festival