थेरगाव-चिंचवडला जोडणार फुलपाखरू उड्डाण पूल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

पिंपरी - थेरगाव-चिंचवड यांना जोडणारा फुलपाखरू आकाराचा उड्डाण पूल महापालिकेतर्फे उभारण्यात येणार आहे. थेरगाव येथील प्रसुनधामशेजारी १८ मीटर विकास आराखड्यातील प्रस्तावित रस्त्यावर २५ कोटी १९ लाख रुपये खर्च करून हा पूल उभारण्याचे नियोजन आहे.

पिंपरी - थेरगाव-चिंचवड यांना जोडणारा फुलपाखरू आकाराचा उड्डाण पूल महापालिकेतर्फे उभारण्यात येणार आहे. थेरगाव येथील प्रसुनधामशेजारी १८ मीटर विकास आराखड्यातील प्रस्तावित रस्त्यावर २५ कोटी १९ लाख रुपये खर्च करून हा पूल उभारण्याचे नियोजन आहे.

दृष्टिक्षेपात उड्डाण पूल
महापालिकेच्या २०१८-१९ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात आवश्‍यक तरतूद
महापालिका सभेची १७ ऑक्‍टोबर २०१७ ला मंजुरी
एकूण खर्च : २५ कोटी १९ लाख 
मुदत : १८ महिने 
पुलाची लांबी :  १०७.५७५ मीटर
रुंदी : १६.२०० मीटर
पुलावरील पदपथ : ३ मीटर दोन्ही बाजूस
फुलपाखरू डिझाईनच्या कमानीची एकूण लांबी : १००  मीटर

वैशिष्ट्ये
 नागरिकांसाठी पुलावरून नदी परिसराचे दृश्‍य पाहण्यासाठी पुलाच्या मध्यभागी दोन्ही बाजूस दोन मीटर रुंदीची गॅलरी
 पुलास मध्यभागी दुभाजक 
 पुलावरून जाण्यासाठी दोन्ही बाजूस दोन-दोन लेन  विद्युत रोषणाईसाठी दोन्ही बाजूस आकर्षक विद्युत खांब 
 पुलाच्या दोन्ही बाजूस फुलपाखराच्या पंखाच्या आकाराच्या आकर्षक लोखंडी कमानी

फायदे
 पिंपरी-चिंचवड लिंक रस्ता आणि चिंचवड स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होणार  चिंचवड, केशवनगर, तानाजीनगर या भागातील नागरिकांना मुंबई-पुणे रस्त्याकडे जाण्यासाठी पर्यायी रस्ता म्हणून वापर करणे शक्‍य  चिंचवड बाजारपेठेतील वाहतुकीवरील ताण कमी होण्यास मदत 
 मोरया गोसावी मंदिर आणि जिजाऊ पर्यटन केंद्राशेजारी असणारा पूल आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरेल  शहराच्या सौंदर्यात भर पडणार  पुलासाठी नदीपात्रात कॉलम नसल्याने पाण्याच्या प्रवाहाला अडथळा नसेल

थेरगाव-चिंचवडला जोडणाऱ्या फुलपाखरू उड्डाण पुलाच्या कामाचे आदेश दिले आहेत. त्या कामाच्या भूमिपूजनाची प्रतीक्षा आहे.
- शिरीष पोरेडी, प्रवक्ते, स्थापत्य विभाग.

Web Title: marathi news PCMC Flyover