पिंपरी चौकाला अतिक्रमणांचा विळखा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 मार्च 2018

पिंपरी - येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाला अतिक्रमणांचा विळखा पडला असून अवैध धंदे, बेशिस्त रिक्षाचालक आणि तळीरामांचा अड्डा यामुळे चौकाचे पावित्र्य धोक्‍यात आले आहे. पोलिस व महापालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे.

चौकालगत महापालिका भवन व वाहतूक पोलिसांचे कार्यालय आहे. अवैध धंदे व अतिक्रमणाकडे दोघांनीही डोळेझाक केलेली आहे. चौकालगत दारूचे दुकान आहे. त्यामुळे मद्यपींचा नेहमीच राबता असतो. यासाठी खाद्यपदार्थ विक्रीच्या हातगाड्यांचाही वापर केला जात आहे. अनेकदा येथे शिवीगाळ आणि भांडणे बघायला मिळतात. 

रिक्षावाल्यांची मनमानी 
चौकाच्या चारही बाजूच्या रस्त्यांवर रिक्षाचालकांनी बेशिस्तपणे रिक्षा उभ्या केलेल्या असतात. त्यामुळे पादचाऱ्यांना मार्ग काढणे कठीण जाते. प्रवाशांकडून मनमानी भाडे आकारले जाते. तीन आसनांची परवानगी असताना सात-आठ प्रवासी बसवले जातात. स्वयंघोषित नेत्यांनी पदपथावरच रिक्षा थांबे थाटलेले आहेत. दरम्यान, अवैध धंद्येवाले व रिक्षाचालकांशी पोलिसांचे हितसंबंध असल्याने कारवाई होत नसल्याची चर्चा आहे. तसेच, येथील सर्वच रस्त्यांवर टपऱ्या, हातगाड्या, पथारीवाल्यांनी अतिक्रमण केलेले आहे. 

‘क’ क्षेत्रीय कार्यालय क्षेत्रात फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येते. चौकाचा बाकी भाग ‘अ’ कार्यालयांतर्गत आहे. कारवाईचे अधिकारी ते क्षेत्रीय अधिकारी व अतिक्रमण विरोधी पथकाला आहेत.
- अण्णा बोदडे,  ‘क’ क्षेत्रीय अधिकारी, महापालिका

‘अ’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत फक्त महात्मा फुले वाचनालय येते. चौकाचा बाकी भाग ‘क’ किंवा ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येत असेल. 
- आशा दुरगुडे,  ‘अ’ क्षेत्रीय अधिकारी

वाहतूक विभागाकडून बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई होत असते. अनेकदा त्यांना चौकातून हाकलून दिले जाते. मात्र, दुकानासमोर उभ्या वाहनांवर कारवाई करायला गेल्यास ते, ‘आमची जागा आहे’ असे सांगतात.  
- रवींद्र निंबाळकर, पोलिस निरीक्षक, पिंपरी वाहतूक विभाग 

Web Title: marathi news pimpri chowk encroachment traffic