'कौशल्य असल्यास नोकरी मिळविणे सोपे '

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 मार्च 2018

पिंपरी -  ‘‘सरकारी नोकऱ्यांचे प्रमाण सध्या कमी झाले आहे. तरुणांनी उद्योगातील मागणीनुसार, बदलत्या तंत्रज्ञानानुसार कौशल्य आत्मसात केल्यास नोकरी मिळविणे सोपे जाईल. तरुणांनी खचून न जाता आपल्यातील उणिवा दूर करण्यासाठी प्रयत्न करायला हवे,’’ असे मत आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मंगळवारी चिंचवड येथे व्यक्त केले. 

ऑटो क्‍लस्टरच्या प्रांगणात जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका नागरवस्ती विकास योजना विभाग यांच्यातर्फे रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते. दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत हा मेळावा झाला. 

त्या प्रसंगी मार्गदर्शन करताना हर्डीकर बोलत होते. महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक संचालक अनुपमा पवार, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, नगरसेवक केशव घोळवे, संतोष लोंढे, नामदेव ढाके नगरसेविका अनुराधा गोरखे, अश्‍विनी बोबडे आदी उपस्थित होते. मेळाव्याला बेरोजगार तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. समाजविकास अधिकारी संभाजी येवले यांनी नियोजन केले. सहायक आयुक्त स्मिता झगडे यांनी प्रास्ताविक केले. सहायक आयुक्त अण्णा बोदडे यांनी सूत्रसंचालन केले.  

मेळाव्याची वैशिष्ट्ये
 ८० उद्योगांचा सहभाग; ८८४५ रिक्त पदांसाठी मुलाखती
 टाटा स्ट्राइव्ह, फोर्स मोटर्स, टाटा बिझनेस, महिंद्रा व्हेइकल्स, टाटा मोटर्स, टीमलिझ सर्व्हिसेस, एजीएस लिमिटेड, कार्वी डिजिकनेक्‍ट आदी कंपन्यांकडून जादा जागांसाठी पदभरती
 मेळाव्यासाठी सकाळी ९ पासून नोंदणीसाठी तरुणांची गर्दी 
 उमेदवारांच्या मुलाखती घेऊन ८० टक्के उमेदवारांची प्राथमिक निवडप्रक्रिया पूर्ण
 मुलाखतीत निवडलेल्या उमेदवारांना कंपन्यांमार्फत पुढील काही दिवसांत नेमणुकीबाबत कळविण्यात येणार

Web Title: marathi news pimpri Commissioner Shravan hardikar Auto Cluster Employment