कचऱ्यापासून सीएनजीची हिंजवडीत होणार निर्मिती

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 फेब्रुवारी 2018

पिंपरी - आपल्याकडे निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची, असा प्रश्‍न अनेक कंपन्यांना पडतो. हिंजवडी आयटी कंपन्यांमधील ही समस्या लवकरच दूर होणार आहे. या कंपन्यांमध्ये निर्माण होणाऱ्या कचऱ्यातून सीएनजी गॅस निर्माण करून त्याचा पुरवठा याच कंपन्यांमधील किचनला करण्याची योजना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने हाती घेतली आहे. येत्या दीड वर्षामध्ये हा उपक्रम कार्यान्वित होणार आहे. 

कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्यामुळे आयटी कंपन्यांमध्ये निर्माण होणाऱ्या कचऱ्याची शास्त्रोक्‍त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे.

कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी एमआयडीसीने या परिसरात पाच एकर जागा निश्‍चित केली आहे. यासाठी निविदा काढली असून, येत्या २७ फेब्रुवारी रोजी ती खुली करण्यात येणार आहे, असे एमआयडीसी आयटी विभागाचे कार्यकारी अभियंता सुधीर नागे यांनी ‘सकाळ’ला सांगितले.

कचऱ्याचे विलगीकरण करून सीएनजी गॅसनिर्मिती केली जाणार आहे. कंत्राटदार कंपनी आयटी कंपन्यांमधील वेगळा केलेला कचरा उचलून प्रक्रिया करणार आहे. हिंजवडी आयटी पार्क तीन टप्प्यांत विभागले असून, त्यात अनेक कंपन्या आहेत. सध्या इथे दररोज २० टन कचरा जमा होतो. त्यातून दररोज दोन हजार ४०० किलो गॅसची निर्मिती करण्यात येईल. प्रकल्पाची क्षमता ३० टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची असेल. तयार होणारा सीएनजी गॅस कंपन्यांतील किचनसह कर्मचारी वाहतूक करणाऱ्या सीएनजी वाहनांना पुरवला जाणार आहे.

Web Title: marathi news pimpri news garbage cng hinjewadi