बाजारपेठा सजल्या साखरगाठींनी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 मार्च 2018

पिंपरी - साडेतीन मुहूर्तांपैकी एक आणि हिंदू नववर्षाचा पहिला दिवस अर्थात गुढीपाडव्यानिमित्त शहरातील बाजारपेठा सजल्या आहेत. गाठी, गुढीचे साहित्य, काठी यासह पाडव्यासाठी नवी उत्पादने खरेदी करण्यासाठी बाजारपेठांमध्ये गर्दी उसळली आहे. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा साखरेबरोबर कारागिरांच्या मजुरीच्या दरात वाढ झाल्याने साखरगाठी महागल्या आहेत.

येथील कॅम्पातील कारखान्यात पाच किलो वजनापर्यंतच्या साखरगाठी बनविल्या जातात. चंपाकळी, पिंपळपान, कैरीपान आदी आकारांत या गाठी बनविल्या असून, शंभर किलो साखरेत ९५ किलोच्या साखरेच्या गाठी तयार होतात. एका कारखान्यात किमान ६ ते ७ कामगारांना रोजगार यानिमित्ताने मिळतो. गुढीपाडव्याचा खास मान असलेल्या साखरेच्या गाठी किमान दहा रुपयांपासून ते ७५ रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. 

दारात वाढ
मशिनवर बनविल्या जाणाऱ्या साखरगाठी वजनाला भारी असतात. त्या गुढीवर लावताना अडचण होते. त्या तुलनेत पारंपरिक आणि हाताने बनविल्या जाणाऱ्या गाठी हलक्‍या असून, त्यांना जास्त मागणी आहे. यंदा साखर व पंढरपूरहून आलेल्या कारागिरांची मजुरी वाढल्याने गाठीच्या दरात वाढ झाली आहे, असे पवन ट्रेडर्सचे पवनकुमार इसरानी यांनी सांगितले.

रेडिमेड गुढी
अनेक ठिकाणी रेडिमेड गुढ्यांनाही पसंती मिळत आहे. टेबलवर, कारमध्ये ठेवता येण्यासारख्या छोट्या गुढीसह मोठ्या रेडिमेड गुढ्याही उपलब्ध आहेत.

Web Title: marathi news pimpri news gudipadava