म्हाडा बांधणार नवीन दीड हजार परवडणारी घरे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 मार्च 2018

शहरातील नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी अनेक भागांत म्हाडा प्रकल्प सुरू करणार आहे. त्यासाठी सरकारी जागा मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नजीकच्या काळात दिघी आणि चिखली परिसरात घरांची उभारणी करण्याचे नियोजन आहे. तेथे जमीन मिळवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रयत्न सुरू आहेत. त्या ठिकाणी जागा मिळाल्यानंतर परवडणाऱ्या घरांच्या संख्येत वाढ होईल. 
- अशोक काकडे-देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी, म्हाडा, पुणे

पिंपरी - परवडणारी घरे बांधण्यासाठी म्हाडाला सरकारकडून पिंपरी आणि तळेगाव परिसरात जमीन मिळाली आहे. त्यामुळे येत्या काही वर्षांत या भागात सुमारे दीड हजार नवीन घरे उभी राहणार आहेत. 

तळेगावमध्ये शहराच्या मध्य वस्तीत व पिंपरीमध्ये डी. वाय. पाटील कॉलेजजवळ प्रत्येकी दोन एकर जागा उपलब्ध झाली आहे. म्हाडाने तळेगावमध्ये ७५० घरे बांधण्याचे नियोजन केले असून, पुढील तीन महिन्यांत प्रत्यक्ष कामाला सुरवात होणार आहे. पिंपरीमधील जागा नागरी कमाल जमीन धारणा कायद्यांतर्गत मिळाली असून, तिथे व्यावसायिक गाळे आणि घरे बांधण्यात येणार आहेत. पुढील दोन महिन्यांत त्याची निविदा काढण्यात येणार आहे.

म्हाडाच्या शहरातील घरांवर दृष्टिक्षेप
    पुढील पाच वर्षांत ७४४० घरांच्या उभारणीचे नियोजन
    पिंपरी सर्व्हे क्र. ३०९ मध्ये १०३४, ताथवडे आणि मोरवाडीत २१०१
    बांधकाम व्यावसायिकांकडून ३६१९ परवडणारी घरे उपलब्ध होणार
    त्यापैकी १२५ घरे उपलब्ध
    उर्वरित घरे २०२० पर्यंत येण्याची अपेक्षा
    सोडत काढलेल्या २५०३ घरांचा ताबा मार्चअखेरपर्यंत देण्यात येणार
    अत्यल्प, अल्प आणि मध्यम, अशा तीन उत्पन्न गटांसाठी घरांची बांधणी
    अत्यल्प उत्पन्न गटासाठीचा एरिया ३० चौरस मीटर (वन बीएचके) 
    अल्प उत्पन्न गटासाठीचा एरिया ३० ते ६० चौरस मीटर (वन व टू बीएचके)
    मध्यम उत्पन्न गटासाठीचा एरिया ६० ते ८० चौरस मीटर (टू व थ्री बीएचके) 
    या घरांचे वाटप लॉटरी पद्धतीने होणार

Web Title: marathi news pimpri news mhada home