'स्थायी'च्या 11 सदस्यांचे राजीनामे घेणार? 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जानेवारी 2018

पिंपरी : महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये असणाऱ्या भाजपच्या 11 सदस्यांचे राजीनामे घेऊन त्या ठिकाणी नवीन सदस्यांची नेमणूक करण्याचा विचार पक्षात सुरू असल्याचे समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांनी सांगितले. पक्षाने हे सूत्र मान्य केल्यास पाच वर्षात 77 पैकी 55 नगरसेवकांना स्थायी समितीवर जाण्याची संधी मिळणार आहे. 

पिंपरी : महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये असणाऱ्या भाजपच्या 11 सदस्यांचे राजीनामे घेऊन त्या ठिकाणी नवीन सदस्यांची नेमणूक करण्याचा विचार पक्षात सुरू असल्याचे समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांनी सांगितले. पक्षाने हे सूत्र मान्य केल्यास पाच वर्षात 77 पैकी 55 नगरसेवकांना स्थायी समितीवर जाण्याची संधी मिळणार आहे. 

महापालिका तिजोरीच्या चाव्या स्थायी समितीकडे असतात. या समितीवर सर्व पक्षांचे मिळून 16 सदस्य आहेत. त्यांच्या सदस्यत्वाचा कालावधी दोन वर्षांचा आहे. सार्वत्रिक निवडणुकीनंतर त्यातील पहिले आठ सदस्य पहिल्या वर्षानंतर निवृत्त होतात. ती नावे चिठ्ठीद्वारे काढली जातात. फेब्रुवारीच्या सभेत नवीन सदस्यांची नियुक्ती होणार आहे. त्याअगोदर ही प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे. त्यामुळे सात फेब्रुवारीला स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांच्या उपस्थितीत निवृत्त होणाऱ्या सदस्यांची 'चिठ्ठी' काढण्यात येणार आहे. 

सध्याच्या स्थायी समितीमध्ये अध्यक्षा सीमा सावळे, आशा शेंडगे, लक्ष्मण उंडे, कुंदन गायकवाड, प्रा. उत्तम केंदळे, उषा मुंडे, हर्शल ढोरे, माधुरी कुलकर्णी, निर्मला कुटे, कोमल मेवाणी (भाजप), राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून अनुराधा गोफणे, वैशाली काळभोर, मोरेश्‍वर भोंडवे, राजू मिसाळ, शिवसेनेचे अमित गावडे आणि अपक्षांचे गटनेते कैलास बारणे आहेत. त्यापैकी आठ जणांच्या नावांची चिठ्ठी निघेल. त्यानंतर नवीन आठ सदस्यांची फेब्रुवारी महिन्याच्या सर्वसाधारण सभेत निवड केली जाणार आहे. 

स्थायी समितीवर काम केल्यास महापालिका कामाची माहिती नगरसेवकांना होते. यामुळे दरवर्षी भाजपच्या सर्व सदस्यांना स्थायी समितीवर संधी द्यावी, अशी मागणी आपण भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्याकडे केली आहे. ते याबाबत निर्णय घेतील. 
- सीमा सावळे, अध्यक्षा, स्थायी समिती, महापालिका

पुण्यातील बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

Web Title: marathi news Pimpri News PCMC Standing Committee BJP corporators