निगडी पोलिस ठाण्यात सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशिन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 मार्च 2018

पिंपरी - जागतिक महिला दिनानिमित्त इनरव्हील क्‍लब ऑफ निगडी प्राइडच्या वतीने निगडी पोलिस ठाण्यामध्ये सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशिन आणि इन्सिनरेटर बसविण्यात आले. 

या वेळी निगडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयकुमार पळसुले, पोलिस निरीक्षक (गुन्हे) शंकर अवताडे, ‘इनरव्हील’च्या अध्यक्षा सविता राजापूरकर, माजी अध्यक्ष साधना काळभोर, प्रणिता अलूरकर, शकुंतला बन्सल, सभासद सुजाता ढमाले, डॉ. रंजना कदम, माधुरी भुरकुले आदी उपस्थित होते.

सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीनमधून नवीन सॅनिटरी नॅपकिन मिळणार आहे. तर इन्सिनरेटर मशिनमध्ये वापरलेले नॅपकिन जमा करता येणार आहेत. त्यामुळे या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली जाईल. 

राजापूरकर म्हणाल्या, ‘‘महिलांना सॅनिटरी नॅपकिन मिळणे, ही काळाची गरज असून त्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे.’’ 

पळसुले म्हणाले, ‘‘अशा प्रकारचा उपक्रम परिसरात प्रथमच सुरू करण्यात आला आहे. पोलिस ठाण्यात सतत महिलांचा वावर असतो. त्याचा लाभ निगडी पोलिस ठाण्यात काम करणाऱ्या महिला पोलिस कर्मचारी व अन्य कामानिमित्त येणाऱ्या महिलांना होणार आहे.’’ 

Web Title: marathi news pimpri news Sanitary napkin vending machine in Nigdi police station