सायलीला तुमच्या मदतीची गरज!

आशा साळवी
सोमवार, 12 मार्च 2018

पिंपरी - सामान्य मुलींप्रमाणे वाढणारी खेळकर, हसरी, खोडकर सायली गजभीव सहा वर्षांची असताना अचानक खेळताना दारात चक्कर येऊन पडली आणि मग चक्‍कर येण्याचे सत्र सुरूच झाले. डॉक्‍टरांना आधी फिट येत असेल असे वाटले. पण, निदानाअंती समजले की तिला ‘प्रायमरी पल्मोनरी हायपरटेंशन’ हा गंभीर आजार झालाय. आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या आई-वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. सायलीचा त्रास वाढत गेला. आता तिच्यावर हृदय आणि फुफ्फुस बदलण्याची शस्त्रक्रिया करायची आहे.

त्यासाठी ५५ लाखांपर्यंत खर्च असून, तो गजभीव कुटुंबीयांच्या आवाक्‍याबाहेरचा आहे. सायलीला सर्वांच्या मदतीची गरज आहे. समाजातील दानशूर व्यक्‍तींना मदतीचा हात पुढे केल्यास तिला जीवनदान मिळेल. 

सायली लाजरस गजभीव (वय ११) दापोडी येथे राहते. पुणे कॅम्प येथील डॉ. दुराईराज (कार्डियॉलॉजिस्ट) यांनी उपचार सुरू केले. मात्र, महागडी औषधे, वडील एकटे कमावणारे, घरी लहान भाऊ, आजी-आजोबा आहेत. दिवसेंदिवस सायलीचा त्रास वाढतच गेला. धाप लागायला सुरवात झाली. चौथीनंतर शाळेत जाणेही अवघड झाले. पण, तिने घरी राहून अभ्यास केला. परीक्षेच्या वेळी ती शाळेत जात असे. तिच्या आजाराची माहिती असल्याने शिक्षकांनीही खूप सहकार्य केले. शाळा-कॉलेजला न जाता परीक्षा देऊन सायली १२ वीपर्यंत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली. नंतर ‘बी.कॉम.’च्या पहिल्या वर्षात प्रवेश घेतला. पण, त्रास खूपच वाढला. हृदयावर येणारे प्रेशर कमी करण्यासाठी औषधोपचार सुरू झाले.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये तिला घरीच खूप त्रास झाला. चक्कर येऊन पडली. नंतर ॲडमिट केल्यावर तिची (२D ECO) ही टेस्ट केली.  पिंपळे सौदागरमधील डॉ. पाटील यांनी तिला हृदय आणि फुफ्फुस बदलावे लागेल. तरच ती जगेल, असे स्पष्ट सांगितले. नेमके काय करावे, हे तिच्या कुटुंबीयांना कळेना. सायलीचे मामा डॅनिअल केदारी आणि मामी संगीता केदारी यांनी खूप शोध घेतल्यावर भारतातील पहिली हृदय आणि फुफ्फुस बदलण्याची शस्त्रक्रिया झालेली सातारा जिल्ह्यातील कोमल पवार हिची माहिती मिळाली. तिची भेट घेऊन पुढील सगळी माहिती मिळाली. त्यानंतर सायलीला चेन्नई येथील ग्लोबल हॉस्पिटल पेरूम्बबक्कम येथे ॲडमिट केले आहे. तेथे तिच्यावर उपचार सुरू आहेत. शस्त्रक्रियेचा व उपचाराचा खर्च गजभीव कुटुंबीयांच्या आवाक्‍याबाहेरचा आहे. आई लता गजभीव लहान-मोठे काम करतात. पण, शस्त्रक्रिया व इतर उपचार यांचा मिळून अंदाजे खर्च ५५ लाखांपर्यंत जाणार आहे. सायलीला बरे करण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्‍तींनी पुढे येण्याची गरज आहे. शस्त्रक्रियेनंतर तिच्या सारख्याच आजारी व्यक्तींना मदत करण्याची सायलीची इच्छा आहे.

Web Title: marathi news pimpri news sayali gajbhiv help heart lungs