पिंपरी: स्कूलबसच्या चाकाखाली सापडून विद्यार्थ्याचा मृत्यू 

संदीप घिसे
गुरुवार, 1 मार्च 2018

पिंपरी : मित्रांसोबत रंग खेळत असताना धावत्या बसमधून पडून चाकाखाली आल्याने एका चौदा वर्षीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला ही घटना गुरुवारी (ता.१) दुपारी च-होली येथे घडली.

राज सतीश कांबळे (वय १४, राहणार लक्ष्मी नारायण नगर, वडमुखवाडी) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज हा दिघीतील रामभाऊ मोझे शाळेमध्ये शिकत होता. शाळा सुटल्यानंतर दुपारी अडीच वाजता राज हा आपल्या मित्रांसोबत स्कूल बसने घरी चालला होता.

शुक्रवारी धुलिवंदन निमित्ताने शाळेला सुट्टी असल्याने त्याचे मित्र बसमध्येच एकमेकांना रंग लावू लागले. मात्र एकमेकांना रंग लावण्याच्या नादात धावत्या बसमधून त्याचा पाय घसरून तोल गेल्याने तो खाली पडून बसच्या चाकाखाली आला. या अपघातात तो गंभीर जखमी झाल्याने त्यास त्वरित रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याबाबत अधिक तपास दिघी पोलिस करत आहेत.

Web Title: marathi news Pimpri News Student dead after falling from school bus