विद्यार्थ्याची पिंपरीमध्ये आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 मार्च 2018

पिंपरी - पाचव्या मजल्यावरून उडी मारून विद्यार्थ्याने आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास डॉ. डी. वाय. पाटील नर्सिंग कॉलेजमध्ये घडली.

पिंपरी - पाचव्या मजल्यावरून उडी मारून विद्यार्थ्याने आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास डॉ. डी. वाय. पाटील नर्सिंग कॉलेजमध्ये घडली.

संदीप खंडू कदम (वय 19, रा. बालेवाडी, मूळगाव बीड) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक भीमराव शिंगाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप हा डॉ. डी. वाय. पाटील नर्सिंग कॉलेजच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत होता. मंगळवारी दुपारी त्याने मित्रांसोबत जेवण केले. त्यानंतर कोणाशी तरी तो फोनवर बोलला आणि अचानक तो कॉलेजच्या पाचव्या मजल्यावर गेला. तेथून उडी मारून आत्महत्या केली. संदीपचे नातेवाईक बीडवरून पिंपरीत येण्यासाठी निघाले आहेत. ते आल्यावरच अधिक माहिती मिळणार आहे.

Web Title: marathi news pimpri news student suicide